मुंबई : गृहरक्षक दलाचे महासंचालक परमबीर सिंह सोमवारी निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी आयोगापुढे हजर झाले. यावेळी आयोगाने सिंह यांच्याविरोधात जारी केलेला जामीनपात्र वॉरंट रद्द केला व त्यांच्यावर १५ हजार रुपये दंड ठोठावला. पण यावेळी सचिन वाझे यांची परमबीर सिंग भेट चर्चेचा विषय ठरली. सुमारे तासभर दोघे एकत्र गप्पा मारत होते.

वाझे-सिंह भेटीबद्दल साहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने प्राथमिक चौकशी केली. एक उपनिरीक्षक व तीन शिपायांचे जबाब नोंदवल्यानंतर त्याची कागदपत्रे नवी मुंबई पोलिसांना सुपूर्द करण्यात आली. वाझेंसोबत आलेले पोलीस नवी मुंबई पोलीस दलाला संलग्न असल्यामुळे ही कागदपत्रे पुढील कारवाईसाठी नवी मुंबई पोलिसांना देण्यात आल्याचे उपायुक्त डॉ. हरी बालाजी यांनी सांगितले. या प्रकरणाची गृह विभागाकडून माहिती घेण्यात आली.

अधिक वाचा  विद्यापीठ आणि महाविद्यालये ऑफलाईन सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

अनिल देशमुख यांच्या वकिलांनी आपली नाराजी न्यायमूर्ती चांदीवाल यांच्यासमोर व्यक्त केली. आयोगाने सचिन वाझेंना आयोगासमोर हजर करण्याचे आदेश दिले आणि ताकीद दिली. आमच्याकरता सर्व अधिकारी समान आहेत. यापेक्षा तुम्ही बाहेर थांबा पण कोणाला भेटू नका, कोणाशी बोलू नका. बोलायचे असल्यास, भेटायचे असल्यास कायदेशीर परवानगी घ्या’’ असे सांगून आयोगाने नाराजी व्यक्त केली.

याचदरम्यान परमबीर सिंग यांनी आयोगाला एक प्रतिज्ञापत्र दिले. त्यात त्यांनी ‘‘आपल्याकडे अजून काहीही पुरावे नाहीत, जे काय आहे ते मी याआधीच यंत्रणांना दिले आहेत. ठाणे कोपरी पोलीस ठाण्यासंदर्भात चौकशीसाठी मंगळवारी परमबीर सिंग हजर होणार आहेत. आयोगापुढे हजर होण्यापूर्वी सकाळी सिंह गृहरक्षक दलाच्या कार्यालयात गेले होते. पण त्यांनी पदभार स्वीकारला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

अधिक वाचा  नाना पटोलेंवर कठोर कारवाई करा; राज्यपालांना भाजपचे निवेदन

पाच तास चौकशी : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिह यांची सीआयडी कार्यालयात सुमारे पाच तास चौकशी करण्यात आली. सिह यांची चौकशी अजून किमान ४ दिवस चालणार आहे. चौकशीसाठी नवी मुंबईतील कोकण भवन इमारतीतील सीआय डी कार्यालयात दुपारी तीनच्या सुमाराला ते हजर झाले होते.

चौकशी करा :अतुल लोंढे

परमबीर सिंह व सचिन वाझे हे चांदिवाल आयोगासमोर चौकशीला जाण्यापूर्वी भेटले. चौकशीला जाणाऱ्या दोन व्यक्ती वा आरोपी अशा प्रकारे भेटू शकत नाहीत, अशी नियमावली आहे. मग अशा परिस्थितीत ते दोघे का भेटले? कशासाठी भेटले? याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.