ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी हे आता आपल्या पदावरुन पायउतार झाले आहेत. पराग अग्रवाल हे आता नवे सीईओ असणार आहेत. यावेळी त्यांनी म्हटलंय की, कंपनीत सह-संस्थापक, सीईओ ते अध्यक्ष ते कार्यकारी अध्यक्ष ते अंतरिम-सीईओ ते सीईओ अशा भूमिका पार पाडल्यानंतर मी आता ठरवलंय की आता थांबण्याची वेळ आली आहे. पराग अग्रवाल हे आता आमचे सीईओ होणार आहेत.

ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्सी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती स्वत:च्या ट्विटर हँडलवरुन दिली आहे. आपलं पद सोडताना त्यांनी ट्विटरचे पुढचे सीईओ पराग अग्रवाल असतील, असं सांगितलंय. संपूर्ण बोर्डाने त्यांना एकमताने पुढील सीईओ म्हणून निवडल्याचंही त्यांनी सांगितलंय.

अधिक वाचा  मी वेडी नाही..ड्रेसिंगवरुन ट्रोल करणाऱ्यांना दिले सडेतोड उत्तर

डॉर्सी यांनी 2006 मध्ये ट्विटरच्या स्थापनेमध्ये मदत केली होती. 2008 पर्यंत त्यांनी सीईओ म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते या पदावरुन पायउतार झाले होते. मात्र, तत्कालीन सीईओ डिक कोस्टोलो यांनी पद सोडल्यानंतर ते पुन्हा सीईओ म्हणून रुजू झाले होते.