मुंबई : दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटने सध्या जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. या पार्श्वभूमीवर याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर काही महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या धास्तीने शाळा सुरु करण्याचा निर्णय परत एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चाईल्ड फोर्सशी चर्चा करणार आहेत. यानंतरच याविषयीचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. याअगोदर १ डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

अधिक वाचा  सर्व मंत्रालयांच्या महत्त्वाच्या बैठकीत स्मार्टवॉच आणि स्मार्टफोनवर बंदी