पुणे : मागील 25 वर्षांपासून सामाजिक कार्यामध्ये कार्यरत राहून अनेक मोर्चे आणि आंदोलन करणारे लढवय्या नेतृत्व म्हणून नावलौकिक मिळविणारे जनाधार संघटना संस्थापक कृष्णा गायकवाड आपल्या समर्थकांसह आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश करत आहेत. पत्रकार भवन पुणे याठिकाणी होणाऱ्या पक्ष कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन पुणेरी स्टाईल वापरून आपल्या संबंधित कार्यकर्ते आणि नागरिकांना पत्र पाठवून केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

कृष्णा गायकवाड यांच्या पत्रामध्ये राजकीय व्यवस्थेतील सद्यस्थितीचे वास्तव मांडताना सरकारी यंत्रणा जर भ्रष्ट नसेल तर आपल्याला मोर्चे आणि आंदोलनांची गरजच काय? असा प्रश्न त्यांनी नागरिकांना विचारला आहे. व्यापक समाजकारणाचा दृष्टिकोन ठेवून राजकारणात उतरलेली नेतेमंडळी आम्हाला आजवर लाभली नाहीत हे आपल्या देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल. पण याला एक अपवाद दिल्लीतील आम आदमी पार्टीचे सरकार असल्याची जाणीव यानिमित्ताने त्यांनी करून दिली आहे.

अधिक वाचा  सातारा जिल्हा बँक निवडणूक: नितीन पाटील यांची वर्णी कशी?; शिवेंद्रराजे मागे का पडले?

अरविंद केजरीवाल यांसारखा सामाजिक कार्याला वाहून घेतलेला कार्यकर्ता राजकारणात आल्यामुळे राजकारणाचे व्यापक समाजकारण करून जनतेला पारदर्शक आणि भ्रष्टाचार विरहित सरकार देऊ शेकले. 25 वर्षे समाजकार्यामध्ये राहून दूषित राजकारण जवळून पाहिल्यामुळे राजकारणाविषयी असणारी चीड अरविंद केजरीवाल यांच्या आप सरकारच्या कारभारामुळे बदलली. देशाला भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक सरकार द्यायचे असेल तर ज्याचा पिंड समाजकारणाचा आहे,अशाच लोकांनी राजकारणात आले तरच व्यवस्था बदलणार आहे. राजकारणात येण्यासाठी हातात झाडू घेऊन उतरलेला आम आदमी पार्टी इतका स्वच्छ पक्ष दुसरा कोणताही नसल्याने शुक्रवार, दि. 26 नोव्हेंबर 2021, पत्रकार भवन पहिला मजला, नवी पेठ, पुणे या ठिकाणी सर्वव्यापी समाजकार्याचा उद्देश नजरेसमोर ठेवून आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश करत असल्याची भावना त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. पत्र वाचणाऱ्या प्रत्येकाला विनंती करत देशाला भ्रष्टाचार विरहित आणि पारदर्शक सरकार देण्यासाठी आपण आप चे सभासद होऊन शक्य असल्यास राजकारणात सक्रिय व्हावे. आपल्यासह राष्ट्रबांधव नात्याने त्यांनी सर्व सुज्ञ नागरिकांना पत्राद्वारे आप च्या प्रवेशाचे आवाहन केले आहे.