लस नाही तर दारु नाही, लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी नवा फंडा
जीवनावश्यक वस्तूंच्या सोबत आता लसीकरण नसेल तर मद्य सुद्धा मिळणार नाही लस नाही तर दारु नाही, लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी नवा फंडा
औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण केवळ 64 टक्के इतके आहे. याबाबत विभागीय आयुक्तांनी नोटीस बजावल्यानं आता जिल्हा प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे.

काय आहे आदेश
औरंगाबादमध्ये लसीचा किमान एक डोस घेतल्या शिवाय आता दारू तर मिळणार नाहीच, मात्र बारमध्ये बसूनही दारू पिता येणार नाही. त्यामुळे मद्यप्रेमींची चांगलीच गोची झालीये. यापूर्वी पेट्रोल, गॅस, किराणा, कपडे खरेदीसाठी लसीकरण सक्तीचं करण्यात आलं होतं. तरीही टक्का वाढत नसल्यानं प्रशासनानं थेट दारू खरेदीसाठीही लसीची अट घातलीय. इतकंच नव्हे तर हॉटेलमध्येही लस घेतलेल्या ग्राहकांनाच सेवा दिली जाणार आहे.

अधिक वाचा  एसटी कर्मचाऱ्यांना संघटनांनी अडवू नये !; गुन्हे दाखल करण्यासही मुभा

औरंगाबादमध्ये मद्यप्रेमींनी नवीन नियमाचा धसका घेतलाय. तर दारू दुकानदारांनी या नियमाला विरोध केलेला नाही. केवळ औरंगाबादच नाही तर मराठवाड्यात कोरोना लसीकरणाचा टक्का घसरलाय. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.