छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. ‘बिग बॉस मराठी’ हा शो लोकप्रिय शोपैकी एक आहे. सध्या बिग बॉस हिंदीचे १५ वे पर्व सुरु आहे. नुकतंच बिग बॉस १५ च्या घरात तीन वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एण्ट्री झाली. अभिनेत्री रश्मी देसाई, देवोलीना भट्टाचार्जी आणि अभिजीत बिचुकले हे तीन स्पर्धक ‘बिग बॉस’ हिंदीमध्ये सहभागी झाले. मात्र अभिजीत बिचुकलेंना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे बिग बॉसमध्ये त्यांच्या एण्ट्रीवर संशय व्यक्त केला जात आहे.

नुकतंच बिग बॉस हिंदीच्या वीकेंड का वॉर या भागात तीन वाईल्ड कार्ड स्पर्धकांनी एंट्री घेतली होती. यात रश्मी देसाई, देवोलीना भट्टाचार्जी आणि अभिजीत बिचुकले यांचा समावेश होता. मात्र नुकतंच मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत बिचुकले यांनी त्यांचे नाव या शो मधून रद्द केले आहे. अभिजीत बिचुकले यांना करोनाची लागण झाल्याचे सांगितलं जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

अधिक वाचा  कोथरूड - बावधन कार्यालयातर्फे कामगारांचे आरोग्य तपासणी शिबिर

पिंकविला या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत बिचुकलेंना करोना झाला आहे. अभिजीत बिचुकले हे येत्या सोमवारी बिग बॉस घरात जाणार होते. मात्र आता त्यांच्या प्रवेशावर साशंकता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे अभिजीत बिचुकलेंऐवजी आता निर्मात्यांनी वाइल्ड कार्ड एन्ट्रीसाठी राखी सावंतची निवड केली आहे.

राखी सावंत तिचा पती रितेशसोबत ‘बिग बॉस १५’ मध्ये प्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे निर्मात्यांनी याबाबतचा प्रोमोही रिलीज केला आहे. मात्र करोनामुक्त झाल्यानंतर अभिजीत बिचुकलेला एंट्री दिली जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.