मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या नात्याला आता येत्या काही दिवसांमध्ये एक नवी ओळख मिळणार आहे. ही ओळख एका नव्या नात्याची सुरुवातही असणार आहे. कारण, विकी आणि कतरिना लग्नबंधनात अडकणार आहेत.

अतिशय खासगी आणि तितक्याच दिमाखदार अशा या विवाहसोहळ्यासाठी आता त्याच पद्धतीनं तयारीही सुरु करण्यात आली आहे.राजस्थानातील जयपूर येथे एका ऐतिहासिक ठिकाणी विकी आणि कतरिनाचा विवाहसोहळा पार पडणार आहे.

बी-टाऊनच्या या मोस्ट हॅपनिंग जोडीकडे सर्वांचच लक्ष असताना त्यांनी लग्नसोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांना मात्र काही नियम आखून दिले आहेत.सर्वात महत्त्वाचा नियम असेल, मोबाईल न आणण्याचा. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होता कामा नये, यासाठीच हा सारा घाट घालण्यात येत आहे. विकी आणि कतरिनानं हा निर्णय मोठ्या रकमेसाठी घेतल्याचं म्हटलं जात आहे.

अधिक वाचा  Omicron Variant ची ही लक्षणं!; डेल्टा पेक्षा ओमायक्रोन हा फरक

विकी आणि कॅट त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ लीक करु इच्छितच नाहीत. त्यामुळे हा अंदाज लावण्यात येत आहे की, तेसुद्धआ लग्नातील फोटो, व्हिडीओ विकून त्यापासून पैसे कमवण्याच्या तयारीत आहेत.