अमेरिकेत कोरोना संक्रमित लहान मुलांचा वाढता आकडा हा जगासाठी धोक्याची परिस्थिती निर्माण करू शकते. अमेरिकेतील ‘अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स’च्या अहवालानुसार ११ ते १८ नोव्हेंबर दरम्यान १ लाख ४१ हजार ९०५ लहान मुलांना कोरोना झाल्याची पुष्टी झालेली आहे.

या अहवालानुसार लहान मुलांच्या कोरोना संक्रमणाची गती ही ३२ टक्क्यांनी वाढलेली आहे. आकडेवारीचा विचार केला तर अमेरिकेमध्ये मागील आठवड्यात एक तृतीयांश लहान मुले कोरोना संक्रमित झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. अमेरिकेमध्ये लहान मुलांची संख्या २२ टक्के आहे. कोरोना महामारीच्या जाळ्यात ३ टक्क्यांपेक्षाही कमी मुले संक्रमणीत झाले आहेत. त्यानुसार ६८ लाख मुले ही संक्रमित झालेली आहेत.

अधिक वाचा  एसटी कर्मचाऱ्यांना संघटनांनी अडवू नये !; गुन्हे दाखल करण्यासही मुभा

अमेरिका येथील अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सच्या अहवाल असं सांगतो की, अमेरिकेच्या सहा राज्यांमध्ये कोरोनामुळे एकाही लहान मुलाचा मृत्यू झालेला नाही. मुलांच्याच सामान्य लक्षणं दिसत आहे. मुलांना किरकोळ आजार होत आहेत. त्यामुळे मुलांना वेळोवेळी इंन्फ्लुयंजा, मेनिनजाईटिस, चिकनपाॅक्स आणि हिपॅटिटिसची लस दिली जात आहे. कारण, मुलांची प्रतिक्रिरशक्ती वाढेल.