मुंबई – त्या अभिनेत्रीचे वडिल हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत. ते एका राजकीय पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या मुलीला बॉलीवूडमध्ये ब्रेक देण्याचे काम प्रख्यात अभिनेता सलमान खान यानं त्याच्या दबंग चित्रपटातून केले होते. त्या चित्रपटानं बॉलीवूडला उत्तम अभिनेत्री दिली असं चाहते म्हणू लागले. त्या अभिनेत्रीचं नाव सोनाक्षी सिन्हा. तिनं आपल्या अभिनयानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या अभिनयाचे समीक्षकांनी देखील कौतूक केले आहे. गेल्या काही चित्रपटांमधून तिनं निराशा केली असली तरी येत्या काळात ती मोठी गुड न्यूज देणार असल्याच्या चर्चेनं चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

अधिक वाचा  राहुल भेटीनंतर राऊत म्हणाले, “तीन आघाड्या झाल्या तरी” काँग्रेसशिवाय एकजुट नाही,

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही प्रख्यात अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आहे. ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी अभिनेत्री आहे. तिचा फॅन फॉलअर्सही मोठा आहे. ती नेहमीच तिच्या वैयक्तिक कारणास्तव चाहत्यांच्या चर्चेत राहिलेली अभिनेत्री आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षीची वेगळी चर्चा समोर आली आहे. ती म्हणजे बॉलीवूडमधील प्रसिद्ध अशा खान कुटूंबियांची सून होणार असल्याची चर्चा रंगली आहे. तिनं आतापर्यत वेगवेगळ्या चित्रपटांमधून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.