भालगुडी ग्रामस्थांच्या विनंती नुसार श्री. कुलकर्णी ( उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग) मार्केट यार्ड येथिल कार्यालयात कोळवण ते भालगुडी (ता.मुळशी) मुख्य रस्त्याच्या विषयी स्थानिक ग्रामस्थांनी सदर अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करुन पण ते अधिकारी व संबंधित ठेकेदार दाद देत नसल्यामुळे पतित पावन संघटना, मुळशी तालुक्याच्या वतीने संबंधित अधिकारी आंबेकर यांना सदर रस्ताच्या कामाच्या दर्जा विषयी व दुरूस्ती विषयी जाब विचारण्या साठी घेराव घालण्यात आला.

तसेच अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावुन सदर रस्ताचे काम ७ दिवसाच्या आत सुरू करावे चांगल्या पद्धतीने करावे असे निवेदन देऊन हमी घेण्यात आली व काम वेळेत न झाल्यास संघटनेच्या वतीने संघटना स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

अधिक वाचा  पुणे : दोन दिवस पाणीपुरवठा बंद असणार

सदर निवेदन देताना पतित पावन संघटना जिल्हा अध्यक्ष दिनेश भिलारे, विश्वास मणेरे, ज्ञानेश्वर साठे, शहर अध्यक्ष श्रीकांतजी शिळीमकर, गोकुळ शेलार, पतित पावन कामगार महासंघाचे रविंद्रभाऊ भांडवलकर तसेच मुळशी तालुका प्रमुख ओंकार मेमाणे व भालगुडी चे ग्रामस्थ तसेच पतित पावन संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थितीत होते.