मुंबई: काँग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहेत. त्यामुळे काँग्रेसने आता स्वबळाचा नारा दिला आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याच्या आदेय़ प्रदेश काँग्रेसने दिले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्षांना पत्र देण्यात आले आहे. या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर तडजोडी न करण्याच्या स्पष्ट सूचना पत्रात देण्यात आल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्राद्वारे आदेश दिले आहेत. राज्यात महाविकास आघाडी असूनही काँग्रेसने पहिल्यांदा अधिकृत भूमिका घोषित केल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष आहे.

अधिक वाचा  कीर्तनकारांनी 5 हजार जास्त घेतले की…इंदुरीकर महाराजांनी असे घेतले फैलावर

दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून नाना पटोले अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वबळावर लढण्याविषयी बोलत होते. काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यांनी कामाला लागण्याचे आदेश देखील दिले होते. आता पत्राच्या माध्यमातून अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळातील पुणे, मुंबई सारख्या मोठ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत येत आहेत त्याच काँग्रेस कशा पद्धतीने रणनीती आखणार याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेना आणि राष्ट्रवादीची भुमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे