मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनसच्या घटस्फोटाच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. प्रियंका आणि निकची लव्ह स्टोरी आता संपते की काय? अशी भीती त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे. सांगायचं झालं तर प्रियंकाच्या रिलेशनशिप आणि तिचं नाव कोणासोबत जोडलं गेलं सर्वांना माहिती आहे. पण निकच्या गर्लफ्रेन्डबद्दल कोणाला माहिती नाही. प्रियंकासोबत लग्न करण्याआधी निकने जवळपास 10 मुलींना डेट केलं आहे.

गायक Miley Cyrus
निक जोनस आणि Miley Cyrus दोघांनी एकमेकांना 2006 पासून डेट करण्यास सुरू केली. तेव्हा त्यांचं वय फक्त 13 वर्ष होतं. त्यांची ओळख एका चॅरीटी इव्हेन्टमध्ये झाली होती. त्यांचं लहानपणीचं हे प्रेम जास्त काळ टिकलं नाही. 2007 साली दोघे विभक्त झाले.

अधिक वाचा  दुसऱ्या मात्रेकडे १ कोटीची पाठ; ५ जिल्ह्यामध्येच बहुतांश लसीकरण

सेलेना गोमेज
मायलीपासून वेगळं झाल्यानंतर निक जोनासने सेलेना गोमेझला डेट केले. दोघे 2008 पासून रिलेशनशिपमध्ये होते. सेलेनाने डब्ल्यू मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितले. तिने निकला डेट केलं आहे.

डेल्टा गुडरेम
सेलेनासोबत ब्रेकअप झाल्यानंतर काही वर्षांनी निक जोनास ऑस्ट्रेलियन गायिका डेल्टा गुडरेमसोबत रिलेशनशिपमध्ये होता. डेल्टा निकपेक्षा आठ वर्षांनी मोठी आहे. फक्त 10 महिने त्यांचं नातं टिकलं. त्यानंतर 2012 साली त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

गिगी हदीद
टॉप मॉडेल आणि निकचा भाऊ जो जोनासची एक्स गर्लफ्रेंड गिगी हदीदसोबतही निकचे नाव चर्चेत आले. गिगी आणि निक यांना 2012 आणि 2013 मध्ये अनेक वेळा एकत्र स्पॉट करण्यात आलं. काही दिवसं दोघांनी एकमेकांना डेट देखील केलं.

अधिक वाचा  ठाकरेंवर ममता बॅनर्जींना विश्वास; म्हणाल्या “आम्ही पुरुन उरलो, सरकारी दहशतवाद्यांचा महाराष्ट्रही…

ओल‍िव्हिया
निक आणि ऑलिव्हियाने 2013 मध्ये त्यांच्या नात्याला सुरुवात केली. ऑलिव्हिया ही माजी एक्स युनिव्हर्स राहिली आहे. दोघेही दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते. पण हे नातं जास्त काळ टिकलं नाही. 2015 साली दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

Georgia Fowler
निक जोनासचे नाव मॉडेल जॉर्जिया फॉलरसोबतही जोडले गेले आहे. दोघेही एकमेकांना अनौपचारिकपणे डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. निकचा भाऊ जो जोनस आणि सोफी टर्नर यांच्या साखपुड्यातही दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं.

Rita Ora
जेव्हा निकचे ‘व्हॉट डू आय मीन फॉर यू’ हे गाणे रिलीज झाले तेव्हा निक जोनास ब्रिटीश गायिका आणि अभिनेत्री रीटा ओराला डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण हे नातं देखील जास्त काळ टिकलं नाही.

अधिक वाचा  एसटी कर्मचारी संपावरून देवेंद्र फडणवीसांनी केली टीका, “मेस्मा लावण्याऐवजी राज्य सरकारने.”

केट हडसन
निक जोनासचे नाव त्याच्यापेक्षा मोठ्या सेलिब्रिटींशी जोडले गेले आहे. निकने 13 वर्षीय अभिनेत्री केट हडसनला डेट केले. 2015 मध्ये दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली. पण दोघांनी त्यांच्या नात्याचा खुलासा कधीही केला नाही.