पुणे: वारजे भागातील मुख्य रस्ते आणि विकास आराखड्यातील अंतर्गत रस्ते विकसित झाले असले तरीही कर्वेनगर आणि वारजे यांचा दुवा असलेला वारजे जकात नाका, ईशान्य नगरी ,शनी मंदिर, डुक्कर खिंड, हा DP रस्ता गेले कित्येक वर्ष अपूर्ण अवस्थेत आहे. पुणे महापालिकेच्या वतीने सदर रस्त्याचे काम सुरू आहे परंतु काही प्रशासकीय अडचणीमुळे ह्या रस्त्याचे काम अर्धवट ठरण्याची भीती लक्षात घेऊन खासदार सुप्रियाताई सुळे यांना यामध्ये जातीने लक्ष घालण्याची विनंती राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी VJNT सेल पुणे शहर कार्याध्यक्ष विष्णू सरगर यांच्या वतीने करण्यात आली आहे.

अधिक वाचा  भाजपवाल्यांच्या माझ्याकडे सीडी, लावल्या तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही : मलिक

कर्वेनगर भागातील अभिमानास्पद उपक्रम डॉ. एपीजे अब्दुल कलाम ई लर्निंग स्कूल च्या कामाची पाहणी करण्यासाठी खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांचा दौरा सुरू असताना विष्णू सरगर आणि त्यांचे सहकारी मित्र यांच्या वतीने हा कर्वेनगर वारजे भागातील वाहतूक कोंडी आणि सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा डीपी रोड पूर्ण करण्याचे ताईंना साकडे घालण्यात आले.

वारजे कर्वेनगर भागातील अनेक गोरगरीब आणि कष्टकरी समाजातील नागरिक आकाश नगर, राजहंस कॉलनी. सुगम विश्व. सिद्धेश्वर नगर या भागामध्ये वर्षानुवर्षे रहिवास करत असून त्यांना प्राथमिक सुविधा मिळण्यासाठी अत्यंत अडचणीचे आहे. पुणे महापालिकेच्या वतीने बीडीपी चे कारण देऊन येथे लाईट, पाणी, रस्ते हे काम होत नाहीत. परंतु वारजे भागातीलच गोकुळनगर व रामनगर या भागात मात्र पुणे महापालिकेच्या सर्व सुविधा असून आकाश नगर भागातील नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्याची मागणी सुद्धा खासदार सुप्रिया ताई यांना करण्यात आली असून यामध्येही जातीने लक्ष घालून नागरिकांना सर्व सोयी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सरगर यांनी सांगितले.

अधिक वाचा  Railway Recruitment 2021: विविध पदांसाठी होणार भरती,काय आहे तपशील, जाणून घ्या

पुणे महानगरपालिकेमध्ये सध्या आपल्याच पक्षाचे नगरसेवक असल्याने या भागातील लोकांच्या ही सुविधा पूर्ववत होतील असे सांगून ताईंनी हे दोन्ही विषय लवकरात लवकर मार्गे लागतील असे सांगितले.