पुणे महानगरपालिकेच्या स्मशान भूमी मध्ये अंत्यविधी करण्यासाठी वारजे कर्वेनगर परिसरातील नागरिकांना मयत पास मिळविण्यासाठी कोथरुड, नवी पेठ येथे लांब जावे लागते. परंतु वारजे कर्वेनगर परिसराला महानगरपालिकेचा बिंदुमाधव ठाकरे दवाखाना जवळच असल्याने तिथे अंत्यविधीसाठी लागणारा मयत पास मिळणे गरजेचे आहे परंतु तेथे तो उपलब्ध होत नाही. तरी सदर दवाखान्यामध्ये 24 तास मयत पास मिळावा अशी मागणी पुणे मनपा आरोग्य अधिकारी आशिष भारती यांच्याकडे निवेदन देऊन उपविभाग अध्यक्ष सचिन विप्र, गणेश शिंदे, संजय काळे, शाखाध्यक्ष किरण जोशी, राहुल फाले यांनी केली.

सचिन विप्र म्हणाले, कर्वेनगर मधील ठाकरे आणि शिर्के दवाखान्यात बाह्यरुग्ण विभाग असुन, 9 ते 5 या वेळात मयत पास मिळणे बंधनकारक आहे, परंतु या वेळात सुध्दा सरकारी यंत्रणा अनास्थेच्या अभावी पास उपलब्ध होत नाही, सदर दवाखान्यात पास उपलब्ध आहे, असा दर्शनी भागात फलक सुद्धा लावलेला नाही. सदर नागरिकांची गैरसोय होत असुन त्वरित बिंदुमाधव ठाकरे दवाखान्यात 24 मयत पास मिळण्यासाठी उपाय योजना करून द्यावी.

अधिक वाचा  राज ठाकरेंचा दौरा ठरला: अयोध्येसह हे ही नियोजन- नांदगावकर