कोरोना महामारीमुळे कोलमडून पडलेल्या रंगभूमीला नवसंजीवनी तसेच कोरोना च्या प्रदिर्घ काळानंतर हरवलेले हास्य, मनोरंजन मिळवण्यासाठी व नाट्य प्रेमी रसिकांची रंगभूमीशी असलेली नाळ सदैव टिकवण्यासाठी आमदार_महोत्सव_२०२१ मधुन केलेला छोटासा प्रयत्न. समस्त कोथरूडकरांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादापुढे नाट्यगृह अपुरे पडले अनेक नाट्यप्रेमीनी उभे राहुन नाटकाचे प्रयोग पाहिले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील, जयंत भावे, नगरसेविका वांसती जाधव, छायाताई मारणे, डॅा.संदीप बुटाला, पुनीत जोशी, कुलदीप सावळेकर, नवनाथ जाधव, अजय मारणे, रणजीत हगवणे, दुष्यंत मोहोळ, ॲड.रुपेश भोसले, अनिताताई तलाठी, मितालीताई सावळेकर, संदिप जोरी, अभिजीत मुळे, प्रकाश काळोखे, अमित तोरडमल, स्वप्नील राजवडे, यशवंतराव बुचके, यांच्यासह आयोजक अजित जगताप व सुजाता जगताप उपस्थित होते.

अधिक वाचा  राज्यात १९५ पैकी १४१ कारखाने सुरू; महिनाभरातच ९७.१८ लाख क्विंटल उत्पादन

पाच दिवस चाललेल्या या महोत्सवाची सुरूवात बाल आनंद जत्रेने झाली. त्यांनतर दिपक रेगे यांच्या बायको कमाल मेहुणी धमाल. संदीप_पाठक यांच्या व~हाड निघालय लंडनला व संकर्षण_क~हाडे व भक्ती_देसाई यांच्या  तु म्हणशील तसं या नाटकांच्या प्रयोगाने झाली. तर समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालुन झाली व नंतर सलील कुलकर्णी व संदीप खरे यांच्या आयुष्यावर बोलु काही ने झाला.