सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. या निवडणुकीत दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागल्याचं दिसत आहे. पाटण येथून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपूत्र सत्यजितसिंह पाटणकर इतकी मते घेऊन विजयी झाले आहेत. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा त्यांनी 58 मतांनी पराभव केला असून त्यांच्यासाठी हा निकाल धक्कादायक आहे.

पाटण प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघ

एकूण मते – 103

झालेली मते – 102

वैध मते – 103

अवैध मते – 000

उमेदवार आणि मिळालेली मते

शंभूराज देसाई – 44 मते

सत्यजितसिंह पाटणकर – 58 मते

सत्यजितसिंह पाटणकर 58 मते मिळवून विजयी

पाटण येथून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपूत्र सत्यजितसिंह पाटणकर इतकी मते घेऊन विजयी झाले आहेत. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा त्यांनी 58 मतांनी पराभव केला असून त्यांच्यासाठी हा निकाल धक्कादायक आहे.

अधिक वाचा  लसीकरण नाही तर, मद्यही मिळणार नाही

शशिकांत शिंदेंचा अवघ्या एका मताने पराभव

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे. तर ज्ञानदेव रांजणे विजयी झाले आहेत. पहिलाच निकाल हा धक्कादायक असल्याचं समोर आलं आहे. या निवडणुकीत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि आमदार शशिकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

जावली प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघ

आमदार शशिकांत शिंदे एका मतांनी पराभूत

एकूण मते – 49

झालेली मते – 49

वैध मते – 49

उमेदवार आणि मिळालेली मते

शशिकांत शिंदे – 24 मते

ज्ञानदेव रांजणे – 25 मते

विजयी उमेदवार – ज्ञानदेव रांजणे

खटाव प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघ निकाल

एकूण मते – 103   झालेली मते – 103

अधिक वाचा  संपात दुही : पडळकर-खोत आझाद; डंके की चोट पे आंदोलन, सदावर्तेंचा इशारा!

वैध मते – 102     अवैध मते – 01

उमेदवार आणि मिळालेली मते

प्रभाकर घार्गे – 56 मते

नंदकुमार मोरे – 46 मते

विजयी उमेदवार – प्रभाकर घार्गे

कराड प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघ निकाल

एकूण मते – 140

झालेली मते – 140

वैध मते – 140

अवैध मते – 000

उमेदवार आणि मिळालेली मते

बाळासाहेब पाटील – 74 मते

उदयसिंह पाटील – 66 मते

विजयी उमेदवार -सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

नागरी बँका / ग्रामीण सहकारी पतपेढ्या मतदारसंघ

एकूण मते – 374

झालेली मते – 360

वैध मते – 374

अवैध मते – 6

उमेदवार आणि मिळालेली मते

सुनील जाधव – 47 मते

रामराव लेंभे – 307 मते

विजयी उमेदवार – रामराव लेंभे 260 मतांनी विजयी

इतर मागास प्रवर्ग मतदारसंघ

अधिक वाचा  कर्वेनगरला विद्युत रोषणाई उदघाटन सोहळा संपन्न

एकूण मते – 1964

झालेली मते – 1892

वैध मते – 1838

अवैध मते – 54

उमेदवार आणि मिळालेली मते

शेखर गोरे – 379 मते

प्रदीप विधाते – 1459 मते

विजयी उमेदवार – प्रदीप विधाते

मतदानाच्या दिवशी दोन गटांत राडा

सातारा जिल्हा बँकेच्या मतदानाच्या दिवशी दोन गटांत राडा झाल्याचं पहायला मिळालं होतं. या निवडणुकीत 21 पैकी 10 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे उमेदवार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत एकूण 21 पैकी 11 उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे 10 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, शशिकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली.