सचिन धनकुडे नाव एक पण विचार विभिन्न वेगळे आणि समाजहितासाठी अर्पित आयुष्य…! कोथरूड सारख्या संपन्न भागामध्ये अनेकांना कोट्याधीश होण्याची स्वप्न पडत असतील परंतु कोट्याधीश लोकांच्या हिताचा विचार करणारा आणि लोकशाहीच्या मजबुतीसाठी वर्षानुवर्षे काम करणारा एक अवलिया म्हणजेच कोथरूड भागातील सामाजिक कार्यकर्ते लोकशाहीचे निस्सीम सेवक सचिन धनकुडे.

राजकीय लोकांच्या दृष्टीने कदाचित सचिन धनकुडे यांचे कार्य हास्यास्पद किंवा अधांतरी असले तरी त्यांचे विचार हे लोकशाहीच्या मजबुतीसाठी कायमच प्रेरित असतात. लोकशाही मजबुतीसाठी गेली वीस वर्षापासून सचिन धनकुडे यांचा लढा सुरू आहे. राजकिय पक्षांची चिन्हं हा बकासुर असून यामध्ये सर्वांचाच(उमेदवरांचा) विनाश होतो. राजकीय पक्षांची चिन्हे ही जाहगीरदारी झाली असून प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला पक्षाच्या वतीने दिला जाणारा A B फॉर्म हा राजकीय पक्षांकडून दिली जाणारी वतनदारी समजली जाते हा फॉर्म मिळवण्यासाठी केली जाणारी उठाठेव, चापलुसी, गुंडगिरी, आणि लक्ष्मी दर्शन हे आता जगजाहीर झाले आहे. लोकशाहीच्या पवित्र प्रक्रियेला हा एक प्रकारचा बकासुर कधी खाईल? याची खात्री देता येत नाही.

अधिक वाचा  गल्ली ते दिल्ली राजकारण्यांनी केलेली भ्रष्ट व्यवस्था पारदर्शक करण्याचे काम आम आदमी करणार - कृष्णा गायकवाड

राजकारण साधे नाही!, सामान्य माणसाचे काम नाही! शहाण्या आणि सभ्य माणसाने राजकारण करू नये! अशा असंख्य गप्पा चौकाचौकात घडत असतानाही याबाबत कोणीच बोलत नाही. याचे दुःख मनी घेऊन सचिन धनकुडे यांनी नवा संकल्प केला आहे या चिन्हंरुपी बकासुराचा वध करायचा…! या भूमिकेने त्यांनी वाढदिवसाचा संकल्प केला असून राजकीय पक्षांची चिन्हे हटवण्यासाठी आपल्या लढाईचा संकल्प केला असून त्यांना या राष्ट्रीय हितासाठी किती येते हे महत्त्वाचे नसले तरी एक अनोखा आणि समाजोपयोगी विषय त्यांनी निवडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणे गरजेचे आहे.

सचिन धनकुडे यांचे विचार त्यांच्याच शब्दात-

आपण स्विकारलेल्या संसदीय लोकशाहीमध्ये मतदाराने आपला लोकप्रतिनिधी मतदान करून व्यक्तीला निवडून देणे अपेक्षीत असते. पण झाले उलटेच आपण उमेदवाराला न पाहता चिन्हाला निवडून देऊ लागलो, चिन्हें अशिक्षितांची गरज म्हणून तात्पूरती केलेली सोय होती. पण यातून निवडणूकांमध्ये एक ना अनेक दोष निर्माण झाले. चिन्हांमुळे अनेक राजकीय पक्षांची दुकानदारी चालू झाली. चिन्हे विकली जाऊ लागली. पक्षा-पक्षामध्ये गट-तट निर्माण झाले, हाजी हाजी, पुढे-पुढे करण्याची गुलामी पद्धत कार्यकत्यांमध्ये निर्माण झाली. संधी साधु कार्यकर्ते, पैसेवाले, वशिलेवाले, गुंड भ्रष्टाचारी यांचीच भरमार राजकीय क्षेत्रात वाढली. त्यामुळे देश व समाजहितासाठी समर्पीत भावनेने काम करण्याच्या व्यक्ती तज्ञ, अभ्यास, शिक्षित, प्रामाणिक काम करणारे कार्यकर्ते या राजकीय व निवडणूक क्षेत्रापासून लांब गेल्या,

अधिक वाचा  इंग्लंड, फ्रान्स, जर्मनीत कोरोनाची तिसरी लाट; पोर्तुगाल, झेक रिपब्लिकमध्ये आणीबाणी

जनताही व्यक्तीला न पाहता, त्यांचे कार्य, प्रामाणिकता न पाहता विचार सरणीच्या नावाखाली वर्षांनुवर्ष एकाच चिन्हाना गुलामासारखे मतदान करू लागली. त्यामुळे कार्यकर्तेही कार्यापेक्षा पक्षाचे चिन्ह कसेही करून कसे भेटेल याकडेच जास्त लक्ष देऊन मोर्च बांधणी करू लागले. म्हणून चिन्ह विरहीत निवडणुका व्हाव्यात अशी आमची भुमिका आहे.

शेवटी भारत हा काही माझा एकट्याचा देश नाही… यामध्ये देश व समाजहितासाठी छोटे-छोटे बदल करण्यासाठी सर्व भारतीय बांधवांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

वाढदिवस निमित्ताने मंगळवार २३-११२०२१ पासून सलग तीन दिवसांचे चर्चासत्र

पहिले पुष्प-

अधिक वाचा  आळंदीला चाललेल्या पायी दिंडीत पिकअप शिरल्याने अपघात.

प्रभाग रचना कार्यकर्त्यांसाठी “शाप की वरदान”.
मंगळवार -२३-११-२१रोजी, सांयकाळी ६ ते….

दुसरे पुष्प-
E.V.M. वरील सर्व राजकीय पक्ष व अपक्षांची चिन्ह हटविल्यावर समाजाचा फायदा की तोटा?
बुधवार-२४-११-२१रोजी, सायंकाळी ६ ते….

तिसरे पुष्प-

निवडणूक आयोग फक्त निवडणुकी पुरताच असतो
का?
गुरुवार – सायंकाळी ६ते….
स्थळ- धनकुडे प्लॉट,कोथरुड डेपो शेजारी,पुणे.