डर्बी क्रिकेट ग्राऊंड कर्वेनगर…… अन् सूर्याची मंद सूर्यकिरणे वारजे परिसरातीआज एक वेगळाच संदेश घेऊन प्रकाशली निमित्त होते…… वारजे भागातील सर्वपक्षीय नेते , कार्यकर्ते आणि पत्रकार बंधु यांचे मध्ये मैत्रीपुर्ण क्रिकेट मॅचचे.

सध्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप आणि एकमेकांना शह देण्यासाठी अनेक राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांच्या द्वारे आपली प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असतानाही एकमेकांमध्ये सलोखा निर्माण होण्यासाठी आज वारजे लोकप्रतिनिधी व पत्रकार यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे वातावरण तयार करण्यासाठी या मैत्री सामान्याचे आयोजन करण्यात आले होते.

पक्षविचार आणि विचारधारा बाजूला ठेवून एका चांगल्या व्यासपीठावरती सर्वपक्षीय पदाधिकारी आणि परिसरातील पत्रकार बंधू एकत्र आल्याने एका चांगल्या मेजवानीचा सर्वच सहभागी खेळाडूंना आस्वाद घेण्यात आला. राजकारण करत असताना विविध आरोप-प्रत्यारोप करीत केले जात असतात परंतु आजच्या मॅच मध्ये वारजे भागातील सर्वपक्षीय लोकांचे एकमेकांशी असलेले सलोख्याचे वातावरण ही त्यांच्या विजयाची मुहूर्तमेढ ठरली. वारजे भागातील पत्रकार संघाच्या वतीने दिलेले 53 धावांचे आव्हान राजकीय पक्षातील अनुभवी व सरावातील खेळाडूंनी लीलया पार करत सामना जिंकला परंतु वारज्याच्या सामाजिक एकतेचे दर्शनही दिले.

अधिक वाचा  महापालिका निवडणूक लांबणीची शक्यता; प्रतीक्षा सरकारच्या अधिसूचनेची

टीम लोकप्रिनिधी : बाबा धुमाळ, सचिन दांगट, किरण बारटक्के, सचिन बराटे, जावेद शेख, गौरव दांगट, मयुर वांजळे, पराग ढेणे,निलेश आगळे, प्रविण सोनावणे.

टीम पत्रकार: माऊली म्हेत्रे, सचिन सिंग, बजरंग लोहार, हेमंत कुलकर्णी, महादेव पवार, राजू पाटील, धनराज माने, प्रदीप बलाढे, राजेंद्र कापसे, अमोल साबळे.

टीम सल्लागार दिलीपभाऊ बराटे, सुभाष आगरवाल, संजय भोर यांच्यासह सर्वच लोकांनी आयोजक व विशेषता व्यक्तिगत लक्ष घातल्याबद्दल सचिन सिंग (टीम पत्रकार) व सचिन दांगट (लोकप्रतिनिधीं) यांचे विशेष आभार मानून असे वारंवार उपक्रम राबवण्याचे आव्हान केले.