पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने कोथरूड मधील नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी सोडवण्यासाठी कै.जयाबाई सुतार या दवाखान्याची निर्मिती फार वर्षांपूर्वी केली आहे. सध्या या दवाखान्यामध्ये महानगरपालिकेच्या वतीने अनेक फेरबदल करण्यात आलेले आहेत. दवाखान्याची डागडुजी, रंगरंगोटी, सुशोभीकरण करण्याचे काम सध्या हाती घेतले असून ते निश्चितच प्रशंसनीय आहे.आपण जर दवाखान्याच्या सुशोभीकरणासाठी इतका खर्च करू शकतो तर साधे झेरॉक्स मशीन उपलब्ध करणे देखील आपल्याला अशक्य नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपणांस या पत्राद्वारे नागरिकांची रात्री-अपरात्री होणारी, गैरसोय टाळता यावी यासाठी सुतार दवाखान्यामध्ये झेरॉक्स मशीनची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

अधिक वाचा  भारत- रशिया ५१०० कोटींचा सौदा; एके-२०३ रायफल्सचा UPमध्ये सुरु करणार कारखाना

परंतु नागरिकांना ज्या मुलभूत गोष्टीची आवश्यकता आहे त्याचा विचार आपल्या विभागाकडून होणे आवश्यक आहे. कोथरूड मधील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर त्याच्या अंत्यविधीसाठी लागणारा मयत पास सुतार दवाखान्यामध्ये उपलब्ध करण्यात येतो.मयत पास मिळवण्यासाठी मयताच्या नातेवाईकांना सुतार दवाखान्यामध्ये जाऊन त्याची खबर द्यावी लागते त्यावेळी प्रशासनाकडून त्याच्या कागदपत्रांची छायांकित प्रत (झेरॉक्स) मागितली जाते. दिवसा झेरॉक्स काढणे सहजरीत्या शक्य होते परंतु रात्री-अपरात्री च्या वेळी दुकाने बंद असल्यामुळे संबंधित कागदपत्रांची झेरॉक्स मिळणे अशक्य होते. अगोदरच दुःखात असलेल्या नातेवाईकांना मग झेरॉक्स साठी विनाकारण पळापळ करावी लागते आणि नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागते. जर दवाखाना प्रशासनाच्यावतीने त्या विभागामध्ये झेरॉक्स मशीन ची उपलब्धता करून दिली तर नागरिकांची होणारी गैरसोय टाळता येऊ शकते.