कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने प्रभाग क्रमांक १०,११ व १२ विशेषतः डहाणूकर कॉलनी व कोथरूड गावठाण हजेरी कोठी अंतर्गत लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये १९ नोव्हेंबर रोजी “स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण मिशन २०२१ – २०२२” अन्वये कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनी,जनवाणी सहकारी संस्था,क्रिश डान्स अकॅडमी व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मी नगर मधील बुद्ध विहार या ठिकाणी “जागतिक शौचालय दिन” साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम कोथरूड  बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या तीनही प्रभागांमध्ये साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात आपापले कार्यक्षेत्रातील सर्व सार्वजनिक वस्ती पातळीवरील शौचालयाची स्वच्छता करणे व शौचालयाची योग्य पद्धतीने निगा राखणे यामध्ये यामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणे व वस्ती पातळीतील नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्याकरता नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

अधिक वाचा  पाणी कपातीचा विचार नाही; उलट फडणवीसांच्या काळातच पाणी कपात झाली!

वस्ती पातळीवरील व सार्वजनिक शौचालय महानगरपालिकेच्या मेहत्तर या हुद्याच्या सेवकांमार्फत सफाई केली जाते. सफाई सेवक काम करून गेल्यानंतर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी वस्ती पातळीवरील नागरिकांनी घ्यावी, शौचालयातील तोडफोड करणे, दरवाजे तोडणे, पान तंबाखू गुटखा खाऊन थुंकू नये, शौचालयात दारू पिऊन बाटल्या  भांड्यात टाकू नये व महिलांनी शौचालयांमध्ये सॅनिटरी पॅड टाकू नये ते स्वतंत्र एका कागदा मध्ये गुंडाळून लाल डॉट करून ते घंटा गाडी ला किंवा स्वच्छ संस्थेच्या कचरावेचकांना द्यावा असे आवाहन वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांनी केले. तसेच नागरिकांचा व कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनी, जनवाणी सहकारी संस्था, शेल्टर सहकारी संस्था,स्वच्छ सहकारी संस्था इत्यादी स्वयंसेवी संस्थांचे अतिशय उत्तम सहकार्य महानगरपालिकेला मिळते.

या स्वयंसेवी संस्थेच्या सहभागाबरोबर इतर काही स्वयंसेवी संस्थांनी नागरिकांचा अधिक सहभाग वाढावा या उद्देशाने जागतिक शौचालय दिन हा कार्यक्रम दरवर्षी राबवण्यात येतो. सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता करणारे सफाई कर्मचारी व केअर टेकर यांना वस्ती पातळीवरील काम करत असताना तुच्छतेची वागणूक दिले जाते तसेच त्यांना अरेरावीची भाषा काही नागरिक करत असतात. या जागतिक शौचालय  दिनानिमित्त नागरिकांनी शौचालय साफ करणाऱ्या सेवकांना माणूस म्हणून चांगली वागणूक व मान सन्मान दिला पाहिजे तसेच त्यांच्याविषयी आदरयुक्त भावना निर्माण होणे आवश्यक आहे. शौचालय साफ करणारा सफाई सेवक स्वतःचा आरोग्य धोक्यात घालून मानवी विष्ठा साफसफाई करण्याचे काम अतिशय प्रामाणिक पणे करत असतो अशा सफाई सेवकांचा सन्मान व कौतुक स्वयंसेवी संस्थेने व नागरिकांनी करणे आवश्यक आहे या उद्देशाने हा कार्यक्रम दरवर्षी राबविण्यात येतो.

अधिक वाचा  काँग्रेस नेत्यांचं प्रत्युत्तर; ममतांसह विरोधकांना हा सल्ला

सदर कार्यक्रम महापालिका सहाय्यक आयुक्त सचिन तामखडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक करण कुंभार, सचिन लोहकरे, प्रमोद चव्हाण, रूपाली शेडगे यांच्या निरीक्षणाखाली तसेच मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे कमिन्स इंडियाचे दीपक बेती, संदीप क्षीरसागर,जनवाणीचे समीर अजगेकर, जगन्नाथ ढगे, नीता नाईक इत्यादीने विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमात शौचालय सफाई करणारे किरण तुसाम, रितेश तुसाम, रस्ता सफाई करणारे दत्ता कांबळे या सेवकाना, माननीयांच्या हस्ते सन्मानपत्र व विशेष भेट वस्तू देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

शिवाय लक्ष्मी नगर मधील बाळू दांडेकर, राजाभाऊ गायकवाड, राहुल कदम, क्रिश डान्स अकॅडमीचे कृष्णा शिंदे व राधा शिंदे व त्यांचे सर्व सहकारी व इतर नागरिक यांनी शौचालय साफ व निगा राखण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करू असे आश्वासन देऊन शौचालय सफाई करण्याच्या मोहीमेत सहभागी झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैजीनाथ गायकवाड यांनी केले.