आळंदी : AAN नेटवर्क व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्या वतीने संगीत क्षेत्रांमधील कार्याची दखल घेऊन ‘द मिरर मॅन’ हा पुरस्कार श्रीक्षेत्र आळंदी येथील गायक आणि संगीतकार पंडित कल्याणजी गायकवाड यांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.शुक्रवार दिनांक 19 रोजी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृह येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.यावेळी AAN नेटवर्क चे संपादक अतुल परदेशी,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव विश्वास आवटे,संगीता तरडे,लिटल चॅम्प विजेती कार्तिकी गायकवाड-पिसे,उद्योजक रोनित पिसे,गायक कौस्तुभ गायकवाड उपस्थित होते.

अधिक वाचा  कर्वेनगरला विद्युत रोषणाई उदघाटन सोहळा संपन्न

पंडित कल्याणजी गायकवाड हे यशस्वी गायक आणि संगीतकार आहे,महाराष्ट्रातील संगीत क्षेत्रात त्यांचा मोठे नाव आहे त्यांच्या शिष्या आणि कन्या कार्तिकी गायकवाड आणि मुलगा कौस्तुभ गायकवाड हे सुद्धा आपल्या गायनाने संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. तसेच कृष्णाई संगीत विद्यालयाच्या माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थी संगीत क्षेत्रात घडवले आहे.अनेक चित्रपटांना आणि मालिकांना त्यांनी संगीत दिले आहे. त्यांनी दिलेल्या संगित क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना AAN नेटवर्क व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला आहे.