पुणे : महाराष्ट्र शासनाच्या आद्यक्रांती लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीच्या वतीने आद्यक्रांती लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कामगिरी केलेल्या मान्यवरांना बालगंधर्व रंगमंदिर झालेल्या कार्यक्रमामध्ये लहुजी पुरस्कार २०२१ दिला गेला आहे.

विधानपरिषदेच्या उपसभापती आ. निलमताई गोन्हे, राष्ट्रवादीचे पक्षप्रवक्ते अंकुश काकडे, आद्यक्रांती लहुजी साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष आयोजक विजय डाकले, आमदार निलेश लंके, चेतन तुपे, मा. गृहराज्यमंत्री रमेश बागवे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना शहरप्रमुख गजानन घरकुडे, संजय मोरे, शिवसेना गटनेते पृथ्विराज सुतार, नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगरसेवक अविनाश साळवे समितीचे सदस्य बाळासाहेब भांडे, डॉ. राजु अडसुळ, राम कसबे, रवि पाटोळे, आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला.

अधिक वाचा  डीएसकेंचा चावा खरंच आमदाराने कारागृहात घेतला?; व्हायरल वर अधीक्षक हे म्हणाल्या…

यावेळी डॉ. मिलिंद आव्हाड, भाऊसाहेब सोनावने, प्रा. शरद गायकवाड, आर्किटेक्ट पद्माकर, कोले, हनुमंत साठे, प्रा. मार्तंड साठे, गणपत घडशी, नाया कसबे, अनिल शिंदे, अनिल हातागळे, युवा सरपंच मयुर भांडे यांच्यासह राज्यभरामधील २० मान्यवरांचा शासकीय समितीच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी राज्यभरामधून अनेक संस्था/ संघटनाप्रमुख आणि लहुप्रमेमींनी गर्दी केली होती.

कार्यक्रम प्रसंगी बोलताना नीलमताई गोन्हे म्हणाल्या क्रांतीगुरू लहुजी साळवे स्मारक समितीच्या कामासंदर्भात योग्य ती प्रक्रिया तातडीने पार पाडण्यासाठी संबंधीत अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात येतील तसेच समितीच्या कार्यालयासाठी तातडीने जागा उपलब्ध करून दिली जाईल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या क्रांतीगुरू लहुजी साळवे स्मारक समितीसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. आता स्मारकासाठी आर्किटेक नेमण्याबाबत तसेच भूसंपादन प्रक्रिया व यूएलसी प्रमाणपत्र यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहे. या स्मारकाच्या कामाला लवकरच प्रारंभ व्हावा यासाठी अधिकाऱ्यांबरोबर सातत्याने चर्चा करून त्यातील अडचणी दूर केल्या जातील.

अधिक वाचा  पतित पावनची 'देव, देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती' तून श्रध्दांजली

सचिन आहिर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे स्मारकाच्या कामाकडे गांभिर्याने लक्ष आहे. महाविकास आघाडी स्मारकाचा प्रश्न नकी सोडवेल. संपूर्ण देशाला प्रेरणादायी ठरेल असे आदर्श स्मारक याठिकाणी शासकीय समितीच्या माध्यमातून उभारले जाईल.

प्रास्ताविक करताना समितीचे अध्यक्ष विजय डाकले म्हणाले, क्रांतीगुरू लहुजी साळवे यांनी समाजाला कुटुंब मानून काम केले. आजचा कार्यक्रम हा समाजाला चैतन्य देणारा कार्यक्रम आहे. समाजाला अपेक्षित असे काम समितीच्या माध्यमातून करण्यात येईल. आयक्रांतीगुरू लहुजी साळवे यांचे विचार नव्या पिढीला कळावेत, समाजाची शैक्षणिक प्रगती साधली जावी यासाठी समितीच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळासाहेब भांडे यांनी केले.