काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या नैनिताल येथील घरावर सोमवारी दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली. आपल्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना इसिस आणि बोको हरम यांसारख्या दहशतवादी संघटनांशी करून खुर्शीद यांनी हिंदुत्ववादी संघटनांचा रोष ओढवून घेतला आहे. त्यांच्याविरुद्ध संतापाचे वातावरण असतानाच सोमवारी त्यांच्या घरावर हल्ला झाला. हल्लेखोरांच्या हातात भाजपचे झेंडे होते.

खुर्शीद यांनी त्यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना इसिस आणि बोको हरमसारख्या दहशतवादी संघटनांशी केली आहे. हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले असून त्यातील वादग्रस्त मजकुरावरून खुर्शीद यांच्यावर विविध स्तरांतून टीका होत आहे. सोमवारी हल्लेखोरांनी खुर्शीद यांच्याविरोधात घोषणा देत त्यांच्या घरात प्रवेश करून आग लावली. तसेच घरावर दगडफेकही केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने खुर्शीद यांचे घर गाठून आतील आग विझवली. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खुर्शीद यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

अधिक वाचा  अर्पित देशभक्त बिपीन रावत : देशाचे पहिले (सीडीएस) प्रमूख कायमच वक्तव्यांमुळे चर्चेत