बॉलीवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचे डिसेंबर महिन्यात लग्न असल्याची जोरदार चर्चा आहे. दोघांचे पुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत राजस्थानमध्ये शाही विवाह सोहळा पार पडणार असल्याचे म्हटलं जातंय.

येत्या 7 ते 12 डिसेंबरदरम्यान हा सोहळा चालेल. लग्नात सहभागी होणाऱया पाहुण्यांची यादी समोर आलेय, ज्यामध्ये बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींचा समावेश आहे. कतरिना-विकी यांनी अद्याप त्यांच्या लग्नाबद्दल मौन पाळले आहे, मात्र बी-टाऊनमध्ये रंगलेल्या चर्चेनुसार दोघे सवाई माधोपूर जिह्यातील सिक्स सेन्स पर्ह्ट हॉटेलमध्ये लग्न करणार आहेत. करण जोहर, अली अब्बास जफर, कबीर खान, मिनी माथूर, रोहित शेट्टी, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, वरुण धवन, त्याची पती नताशा दलाल आदींचा वऱहाडींच्या यादीत समावेश आहे.

अधिक वाचा  ओमिक्रॉन व्हेरिएंट: प्राथमिक शाळा 1 डिसें लाच सुरू होणार- टोपे