मुंबई: भारताला स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले असं वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे, तिच्या या विधानाचे ज्येष्ठ मराठी कलाकार विक्रम गोखले यांनी समर्थन केल्यामुळे खळबळ उडाली. आता, मराठी साहित्य मंडळाने विक्रम गोखलेंवर देशद्रोहा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

मराठी साहित्य मंडळाच्या वतीने विक्रम गोखले आणि कंगना रनौतच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी नौपाडा पोलीस ठाण्यात मराठी साहित्य मंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर आणि ठाण्यातील साहित्यिकांनी हे निवेदन दिले आहे.

अधिक वाचा  "महाराष्ट्रातही आमचे मतभेद आहेत तरीही..."यूपीएच्या नेतृत्वावरुन संजय राऊतांनी ममतांना दिला सल्ला

‘देशात सर्व जाती धर्माची लोक शांततेने आणि गुण्यागोविंदाने राहत आहेत. मात्र केवळ प्रसिद्धीसाठी काही तरी वक्तव्य आणि चर्चेत राहण्यासाठी कंगना नेहमी करत राहते. मात्र विक्रम गोखले हे ज्येष्ठ कलाकार आहेत त्यांनी कंगणाला समर्थन देऊन देश स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा आणि देशाचा अपमान केला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया घुमटकर यांनी व्यक्त केली.

तसंच, कंगना आणि विक्रम गोखले यांच्यावर लवकरात लवकर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मराठी साहित्य मंडळाच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे.

काय म्हणाले होते गोखले?

विक्रम गोखले यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीने काल, पुण्यात सन्मान सोहळा आयोजित करणात आला होता. यावेळी अभिनेते विक्रम गोखले यांनी देशाचं राजकरण तसंच सध्याच महाराष्ट्रातील राजकारण यावर भाष्य केलं. त्याचप्रमाणे त्यांनी यावेळी बॉलिवू़ड अभिनेत्री कंगना रणावतने देशाच्या स्वातंत्र्यवरून केलेल्या विधानाला देखील पाठिंबा दर्शवला.

अधिक वाचा  फेसबुक, गूगलचा जाहिरात महसूल सर्वाधिक; भारतीय माध्यमांपेक्षा १५ हजार कोटी रुपये अधिक

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना विक्रम गोखले म्हणाले होते की, होय, कंगना रणावतच्या विधानाशी मी सहमत आहे, त्यावेळी देशासाठी फासावर जाऊ दिलं गेलं, त्यांना वाचवता आलं असतं पण त्यावेळी राजकारणात वाचवलं गेलं नाही, असं म्हणत अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या विधानाचं समर्थन केलं होत. यावरून अनेक उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.