नवी दिल्लीः काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद त्यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या‘ Sunrise Over Ayodhya या पुस्तकावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर म्हणाले की, त्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अयोध्येतील रामजन्मभूमीवरचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा चांगला निर्णय होता हे लोकांना समजावे यासाठी लिहलेले आहे.

देशाभरात गेले तीन दिवस त्यांच्या नविन पुस्तकात हिंदूत्वाबद्दल आणि रामजन्मभूमीवरच्या लिखाणावर वाद आणि तीव्र राजकीय टीका सुरू आहेत. शुक्रवारी संध्याकाळी त्यांनी यावर पहिल्यांदाच प्रतिक्रीया दिली. “ज्याला राजकारण करायचे आहे, ते तसे करतील आणि ज्याला पुस्तक लिहायचे आहे, ते पुस्तक लिहितील. माझे पुस्तक हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी आहे आणि लोकांना हे समजण्यासाठी आहे की सर्वोच्च न्यायालयाचा (अयोध्येवरील) निकाल चांगला आहे,” खुर्शीद म्हणाले.

अधिक वाचा  कर्वेनगरला विद्युत रोषणाई उदघाटन सोहळा संपन्न

काय आहे हे सर्व प्रकरण

बुधवारपासून माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या नवीन पुस्तकात “सनराईज ओव्हर अयोध्या: नेशनहूड इन अवर टाइम्स” मध्ये “हिंदू धर्माची बदनामी आणि तुलना दहशतवादाशी” केल्याची टीका होतेय आणि ते वादातच्या घेऱ्यात सापडले. खुर्शीद यांचे अयोध्या निकालावरील पुस्तक गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाले. त्यात अयोध्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालवर भर देऊन लिहले आहे. खुर्शीद यांनी पुस्तलात हिंदुत्वाची तुलना ‘इसिस आणि बोको हराम’सारख्या कट्टरपंथी दहशतवादी गटांशी केली आहे.

पुस्तकावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना, भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी शुक्रवारी सांगितले की, काँग्रेस पक्षाचा हिंदू धर्मावरील हल्ला हा योगायोग नाही. संधी मिळेल तेव्हा हिंदू धर्मावर हल्ला करण्याचा काँग्रेसचा स्वभाव असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपच नाही तर, त्यांचाच पक्षाचे जेष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आजाद यांनी ही म्हटले की, हिंदुत्वाची तुलना ISIS आणि जिहादी इस्लामशी करणे चुकीचे आणि अतिशयोक्ती आहे.

अधिक वाचा  Omicron Variant ची ही लक्षणं!; डेल्टा पेक्षा ओमायक्रोन हा फरक

दरम्यान, गुरुवारी दिल्लीच्या दोन वकिलांनी खुर्शीद यांच्याविरुद्ध त्यांच्या पुस्तकात हिंदू धर्माची बदनामी आणि दहशतवादाशी तुलना केल्याच्या तक्रार दिल्ली पोलिसांकडे केली आहेत.