पुणे : राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद पुणे शहरात झाली. शिवाजीनगर येथे १०.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. गेल्या चार दिवसांपासून शहर आणि परिसरात थंडीचा कडाका वाढत असून, रोज नव्या निचांकी तापमानाची नोंद होत आहे.

संपूर्ण राज्यात हवामान कोरडे असून, पुणे शहरासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पुणे शहर आणि परिसरात तर किमान तापमानात रोज एक अंश सेल्सिअसने घट होत आहे. गुरुवारी सरासरीच्या किमान तापमानाच्या तुलनेत ४.८ अंश सेल्सिअसने घट झाल्याचे हवामान विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

अधिक वाचा  ZP, पंचायत  सदस्य संख्या वाढ; हिवाळी अधिवेशनात विधेयक

त्यामुळे शहर आणि उपनगरात सकाळी कडाक्याच्या थंडीबरोबर धुके पडत आहे. रविवार (ता.१४) पर्यंत शहरात आकाश निरभ्र, हवामान कोरडे आणि सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणावर थंडी पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. रविवारनंतर मात्र दुपारी अकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडी सुद्धा कमी होऊ शकते.

शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस)

ठिकाण :             मंगळवार :       बुधवार :     गुरुवार

शिवाजीनगर :           १२.७              ११.८        १०.९

अधिक वाचा  जागतिक एड्स दिन २०२१: एड्स आजाराविषयी गैरसमज,इतिहास आणि महत्त्व सविस्तर वाचा

लोहगाव :                  १५.०              १४.२       १३.९

पाषाण :.                  १३.४               १२.६.       ११.५

चिंचवड :.                 १८.१               १७.६         १७.०

लवळे :                     १७.९              १६.२         १७ .०

अधिक वाचा  राऊतांचे सध्याचे नेते सोनिया, राहुल आणि प्रियंका - फडणवीस

मगरपट्टा :.                १९.१              १८.८          १७.८