मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाने दिलेल्या न्यायलयीन कोठडीला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानं पुन्हा ईडी कोठडीत जावं लागलं होतं. मुंबई हायकोर्टानं अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत सुनावलेली ईडी कोठडी आज संपणार आहे. अनिल देशमुख यांना जामीन मिळणार का हे पाहावं लागणार आहे.

अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंगप्रकणी 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीची मुदत शनिवारी संपल्यानंतर पीएमएलए सत्र न्यायालयानं अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, ईडीनं देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीला आव्हान दिलं होतं. हायकोर्टानं अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती.

अधिक वाचा  तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, बिपिन रावत गंभीर; 11 मृत्यू

नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता.

निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.

अधिक वाचा  न्यूझीलंडचा पहिला डाव 62 धावांतच आटोपला; फिरकीसमोर घसरगुंडी

ईडीनंतर सीबीआयच्या कारवाईची टांगती तलवार

अनिल देशमुख सध्या ईडी कोठडीत असून ईडीनंतर सीबीआय देखील अनिल देशमुखांवर कारवाई करण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.