महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आरोपानंतर कोथरूड शास्त्रीनगर भागांतील स्मशानभूमीच्या दुरुस्तीच्या कामाला पुणे महापालिकेच्या वतीने प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रयत्नांमुळेच सदरील काम केले जात असल्याची चर्चा सध्या शास्त्री नगर परिसरात सुरू आहे. शास्त्रीनगर स्मशानभूमी ही राजकीय श्रेय घेण्याची जागा नसून सर्वसामान्य लोकांच्या नित्याच्या गरजेची गोष्ट असल्याने यामध्ये राजकारण न करण्याची मागणी उपविभाग प्रमुख रमेश उभे यांनी केली आहे. आज पालिकेत झालेल्या सत्तांतर यामुळे स्मशानभूमीला मरणासन्न अवस्था आली होती.  सर्वसामान्यांना या राजकीय बदलाचा त्रास सहन करावा लागत होता. अंत्यविधीसाठी आलेल्या सर्व नागरिकांना या सर्व सोयी-सुविधांचा अभाव यांचा सामना करावा लागत आहे.

अधिक वाचा  सीरमचे लस उत्पादन ५०% कमी; पूनावालांनी सांगितलं हे कारण….

शास्त्रीनगर समशान भूमीतील सर्व खराब पत्रे बदलने सुरू झाले असून; पत्र्यांची चाळण झालेले पत्रे बदलून नवीन पत्रे टाकण्यात येत आहेत. अंत्यविधी करताना नातेवाईकांना खूप त्रास होत होता; यामध्ये महिलांना अत्यंत गैरसोयीचे वातावरण निर्माण झाले होते.