पुणे (प्रतिनिधी पूनम बासुतकर) : संपूर्ण भारतात छठ उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात जरी हा उत्सव साजरा केला जात नसला तरी पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये छठ पूजा वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. त्याचप्रमाणे सद्यस्थितीत महाराष्ट्रात मोठ्या संख्येने स्थायिक झालेल्या उत्तर भारतीयांच्या माध्यमातून छठ उत्सव मुळा – मुठा नदीच्या किनाऱ्यावर मांजरी बुद्रुक, पुणे याठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छठ पूजा या सणाला विशेष महत्त्व प्राप्त करून देण्याचे सहकार्य मांजरी बुद्रुक चे मा उपसरपंच तथा विधमान ग्रामपंचायत सदस्य अमित आबा घुले यांनी दिले आहे.

अधिक वाचा  एकावर एक फ्री थाळी चांगलच महागात; तब्बल ८९ हजारांचा ग्राहकाला गंडा

हा एकमेव सण आहे ज्यामध्ये उगवत्या आणि मावळत्या सूर्याची पूजा केली जाते. एखाद्या व्यक्तीने केवळ त्याच्या चांगल्या काळातच साथ दिली पाहिजे असे नाही तर त्याच्यावर वाईट वेळ आली तरीही त्याला साथ दिली पाहिजे असा त्याचा तार्किक अर्थ आहे. हा असा सण आहे ज्यात जाती पंथाला महत्व नाही. सर्व एकत्र घाटावर पूजा करतात. एकच प्रकारचा प्रसाद बनवतात. कुठेही भेदभाव नाही. वैदिक काळातील कठोर जातिव्यवस्थेचे समर्थन न करणाऱ्या काही हिंदू सणांपैकी हा एक असणाऱ्या या सणाला त्याच परंपरागत पद्धतीने करण्यासाठी मोलाची मदत अमित आबा घुले यांनी केल्याने सर्व उत्तर भारतीयांच्या वतीने त्यांचे विशेष आभार  न्युजमेकर.लाईव्ह च्या प्रतिनिधी पूनम बासुतकर यांच्याशी बोलताना व्यक्त केले. यावेळी उत्तर भारतीय नागरिक आपल्या कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.