शिवसेना हिंदुत्व विसरली. शिवसेना सेक्युलर म्हणजेच धर्मनिरपेक्ष झाली, असे आरोप भाजपाकडून शिवसेनेवर सतत केले जातात. त्याच भाजपाचा रिमोट पंट्रोल ज्यांच्या हाती आहे त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते मात्र इतरांना सेक्युलॅरिझमचे धडे देत आहेत.

इस्लामी राजवट असलेल्या बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर हल्ले होत आहेत. मंदिरे पह्डली जात आहेत. खुलेआम मूर्तीभंजन सुरू आहे. त्याचा जाहीर निषेध नोंदवण्याऐवजी संघाच्या नेत्यांनी बांगलादेशच्या शेख हसीना सरकारला सेक्युलर होण्याचा अजब सल्ला दिला आहे. त्यामुळे हेच का संघाचे हिंदुत्व, असा सवाल केला जात आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते राम माधव यांनी एका इंग्रजी दैनिकात बांगलादेशातील घडामोडींवर लेख लिहिला आहे. बांगलादेशात दुर्गा पूजा उत्सवा वेळी धार्मिक हिंसाचार झाला. मुस्लिमांनी हिंदूंवर हल्ले केले. पूजा मंडप, मंदिरे उद्ध्वस्त केली गेली. हिंदूंच्या हत्या झाल्या. हिंदू स्त्रियांवर बलात्काराच्याही घटना घडल्या. तरीही त्यावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री ए.के. अब्दुल मोमीन हे करत असल्याची टीका राम माधव यांनी या लेखात केली आहे. मात्र दुसरीकडे बांगलादेशने शेख मुजीबूर रहमान यांची धर्मनिरपेक्षता कायम राखली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

अधिक वाचा  "महाराष्ट्रातही आमचे मतभेद आहेत तरीही..."यूपीएच्या नेतृत्वावरुन संजय राऊतांनी ममतांना दिला सल्ला

जातीय दंगली रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल विरोधी पक्षाने शेख हसीना यांना आरोपीच्या पिंजऱयात उभे केले आहे. मात्र राम माधव यांनी शेख हसीना यांची प्रशंसा या लेखात केली आहे. ‘शेख हसीना सरकारने हिंसाचारप्रकरणी 500 जणांना अटक केली. हिंसाचारग्रस्त नागरिकांना नुकसानभरपाई दिली. शेख हसीना यांच्या कार्यकाळात अल्पसंख्याक हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन नागरिक सुरक्षित झाले,’ असे माधव यांनी नमूद केले आहे.

‘दुर्गा पूजेच्या वेळी शेख हसीना सरकारने दुर्गा मंडपांना सुरक्षा पुरवली होती. ‘धोरमो जर जर, उत्सोब शोबार’ (धर्म हा एकाचा असतो, पण उत्सव सर्वांचा असतो) अशी घोषणा शेख हसीना यांनी दिली होती. पण दुसरीकडे पाहिले तर दुर्गा पूजेच्या काळात जातीय दंगली झाल्या. त्याचे व्हिडिओही आहेत. त्या दंगली 70 पेक्षा जास्त जिह्यांमध्ये पसरल्या यावरून त्या पूर्वनियोजित असल्याचे सिद्ध होते, असेही राम माधव यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा  पुणे : दोन दिवस पाणीपुरवठा बंद असणार

हिंदू रक्षणाऐवजी ‘सेक्युलॅरिझम’वर भर

बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण व्हावे यावर जोर देण्याऐवजी राम माधव यांनी या लेखात ‘सेक्युलॅरिझम’वर भर दिला आहे. बांगलादेशातील धर्मनिरपेक्ष शैक्षणिक अभ्यासक्रमाशी छेडछाड केली जात आहे असे त्यांनी म्हटले आहे. त्याचे दाखलेही त्यांनी दिले आहेत. 2017मध्ये सुनील गंगोपाध्याय, शरदचंद्र चट्टोपाध्याय, हुमायून आझाद, रवींद्रनाथ टागोर यांच्या कविता शालेय अभ्यासक्रमातून वगळण्यात आल्या. त्याजागी इस्लामी कवितांचा समावेश केला गेला, असे त्यांनी म्हटले आहे.

इतिहासाचे दाखले

फाळणीच्या वेळी फजलूल हक आणि मुक्तिसंग्रामाच्या वेळी मुजीबूर रहमान यांच्या प्रयत्नांमुळे बांगलादेशची धर्मनिरपेक्ष, समाजवादी, राष्ट्रवादी आणि लोकशाही राष्ट्र अशी ओळख होती. फजलूल हक यांनी तत्कालीन बंगालमध्ये मुस्लीम लीगच्या इस्लामवादी विचारसरणीला थारा दिला नव्हता. फाळणीला त्यांनी विरोध केला होता आणि बंगालची स्वतंत्र ओळख कायम ठेवण्यासाठी काँग्रेस नेते शरतचंद्र बोस यांच्या सहकार्याने काम केले होते, अशा इतिहासाचीही आठवण राम माधव यांनी या लेखात करून दिली आहे.

अधिक वाचा  ओमिक्रॉनचे 7 रुग्ण; घाबरू नका, काळजी घ्या- महापौर

अवामी लीगचे संस्थापक ‘बंगबंधू’ शेख मुजीबूर रहमान यांनी 1972मध्ये बांगलादेशच्या राज्यघटनेत ‘सेक्युलॅरिझम’ हे मूळ तत्त्व म्हणून स्वीकारले होते. त्यामुळे बांगलादेशच्या मुस्लिमांची ‘बंगाली मुस्लिम’ अशी ओळख बनली होती. जनरल झिया-उर-रहमान आणि त्यांच्यानंतर जनरल इर्शाद यांनी 1979मध्ये घटनेत सुधारणा करून त्यातील ‘सेक्युलॅरिझम’ हा शब्द वगळला. इर्शाद यांनी 1988मध्ये इस्लाम हा बांगलादेशचा राष्ट्रीय धर्म असल्याचे जाहीर केले. 2011मध्ये शेख हसीना यांनी घटनेमध्ये पंधरावी दुरुस्ती करून ‘सेक्युलॅरिझम’ शब्दाचा पुन्हा समावेश केला. अशा प्रकारे बांगलादेशची ओळख ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ आणि ‘इस्लामी राष्ट्र’ अशी सतत बदलत गेली. शेख हसीना यांच्यासमोर आता त्यांचे पिता मुजीबूर रहमान यांचे धर्मनिरपेक्ष राष्ट्राचे स्वप्न कायम ठेवण्याचे आव्हान आहे, असे राम माधव यांनी लेखाच्या शेवटी नमूद केले आहे.