पुणे : महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी दीपावली च्या मुहूर्तावर दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष तथा सरपंच निवृत्ती अण्णा बांदल यांनी केले होते. विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून परिसरात विकासाचा डोंगर रचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या सहकार्याने अनेक गोरगरीब लोकांना मदत केली आहे. रस्ते, पाणी, करोना काळात भाजीपाला आदी साहित्य घरपोच देऊन सर्वसामान्य लोकांना त्यांनी मदत केली आहे.

दीपावली पाडवा निमित्त या परिसरात पहिल्यांदाच दिवाळी पहाटच्या कार्यक्रमातून हिंदी आणि मराठी, भक्ती गीते व भावगीते घेऊन निवृत्ती बांदल यांनी सर्व नागरिकांना आगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.

अधिक वाचा  DCGI कडे सिरमचा अर्ज प्रलंबित ; अनेक देशात 'बूस्टर डोस'ला सुरुवात

या प्रसंगी युवा नेते दीपकशेठ बांदल, सामाजिक कार्यकर्ता रोहिणी बांदल आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी अण्णांनी सर्व नागरिकांना दीपावलीच्या व पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या