बावधन मार्केट यार्ड च्या वतीने बावधन, कोथरुड व मुळशी तालुक्यासाठी प्रथमच वसुबारस निमित्त देशी_गोवंश_प्रदर्शन_व_स्पर्धा आणि “किल्ले स्पर्धा” घेण्यात आल्या होत्या. वाढत्या शहरीकरणामुळे गोमातेचे महत्त्व वाढण्यासाठी व नवीन पिढीला आपल्या संस्कृतीची जाण होऊन प्रोत्साहन देण्यासाठी बावधन मार्केट यार्ड चे संस्थापक गोरख दगडे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.

भारतीय संस्कृतीची परंपरा जतन होण्यासाठी व परिसरातील सर्व नागरिकांना या किल्ले आणि गोमातेचे महत्त्व समजण्यासाठी या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व गो पालकांचे संचालिका सौ. मेघा दगडे यांनी ओवाळून स्वागत केले.

या स्पर्धांमधील विजयी स्पर्धक पुढीलप्रमाणे.

अधिक वाचा  सरु आजीने डॉक्टराला दिली धमकी -‘देवमाणूस2'

प्रथम – संतोष कोयते (काजळी खिल्लार गाय)

द्वितीय – दिलीप दगडेपाटील (साहिवाल गाय)

तृतीय – अशोक दगडेपाटील (पंढरपुरी खिल्लार वळू)

चतुर्थ- दयावान बांदल (खिल्लार, कालवड)

उत्तेजनार्थ – सागर बांदल (खिल्लार गो-हा)

किल्ले_स्पर्धा

प्रथम – शिवनेरी स्टार, शिवनेरी गड (सारंग, आर्या चौधरे, आर्या गायकवाड, विदिशा, रचित, प्रजित, ऋषील, रोहन)

द्वितीय – मानव्य संस्था गृप , प्रतापगड ( साहिल, यश)

तृतीय – शिवभक्त वाॅरियर्स – आर्या, रुद्रा, सार्थक, आरमान, ईशान

चतुर्थ – बावधन मार्केट यार्ड गृप – सिंहगड ( स्पर्धक -सुहान, अथर्व, शुभम, अमर)

यावेळी मुख्य संचालक गोरख दगडे, संचालिका सौ. मेघा दगडे, संचालक जितेश शेलार, ईरफान इजेरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दीपक दुधाणे, मधुकर पोहनेरकर, राजेश कुलकर्णी, गणेश लोखंडे, सदाशिव कुलथे, सुनिल दगडे, नितीन दगडे यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिस आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.