नांदेड: नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आपला गड कायम राखत महाविकास आघाडीला दणदणीत विजय मिळवून दिला आहे. विशेष म्हणजे, भाजप नेत्यांपाठोपाठ वंचित बहुजन विकास आघाडीचे (vba) नेते प्रकाश आंबेडकर यांनीही चव्हाणांना थेट आदर्श प्रकरणाची धमकी दिली होती. पण, चव्हाणांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या बदलाही या निवडणुकीतून पूर्ण केला आहे.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी तब्बल 108840 मते मिळत दणदणीत विजय मिळवला आहे. तर भाजपच्या सुभाष साबणे 66907 मतं मिळवून पराभूत झाले आहे. जितेश अंतापूरकर यांनी 41933 मतांनी जिंकली आहे. तर वंचित बहुजन विकास आघाडीकडून उत्तम रामराव इंगोले यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण, त्यांना फक्त 11348 मतं मिळाली.

अधिक वाचा  संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; धक्कादायक निर्णय

विशेष म्हणजे, निवडणुकीच्या प्रचारात एकीकडे भाजपचे नेते ईडीच्या कारवाईची धमकी देत होते. तर त्यांच्याच विधानाची रिघ ओढत प्रकाश आंबेडकर यांनीही धमकीचा बार उडवून टाकला. ‘आदर्श प्रकरण पुन्हा काढायचे का? अशी धमकीच प्रकाश आंबेडकर यांनी उघडपणे अशोक चव्हाणांना दिला होती.

तसंच, ‘अशोकराव बोलले वंचितच्या गाडीत पेट्रोल भाजप भरते. अशोकराव, ही चूक आयुष्यात पुन्हा कधी करू नका. निवडणूक होऊ द्या, आमच्या गाडीमध्ये कुणी-कुणी पेट्रोल भरलं हे राहु द्या, आम्ही हायकोर्टात विचारतो आदर्श प्रकरणात कुणाकुणाचे फ्लॅट आहे. अशोक चव्हाण आपणाला बायको आणि सासुबरोबर जेलमध्ये जायचं का ते ठरवा? असं म्हणत प्रकाश आंबेडकरांना इशारा दिला होता.

अधिक वाचा  पराग अग्रवाल ट्विटरचे नवे CEO ; एकमताने निवड जॅक डोर्सी पायउतार

विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीत वंचित फॅक्टरमुळे नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना मोठा फटका बसला होता. लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडणूक लढवली. परंतु, वंचित आघाडीच्या फॅक्टरमुळे अशोक चव्हाणांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आज देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने अशोक चव्हाण यांनी अचूक प्लॅनिंग करत वंचितला पराभवाची धूळ चारत लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपाही काढला.

अशोक चव्हाणांची प्लॅनिंग!

विशेष म्हणजे, या निवडणुकीसाठी भाजपने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली होती. भाजपने उमेदवार आयात केल्याने काँग्रेसला ही निवडणूक जड जाणार होती. त्यात अशोक चव्हाण यांनी देखील खेळी केली. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांना काँग्रेसमध्ये आणलं. भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये गेल्याने भाजपा चांगलच धक्का लागला. खतगावकर यांच्या बॅटिंगमुळे महाविकास आघाडीच्या विजयाचा मार्ग आणखी सुकर झाला. भाजप नेत्यांनी दिलेल्या धमकीमुळे याचा काँग्रेस उमेदवाराला फायदा झाला आणि दणदणीत विजय मिळवला.