पुणे: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख असली तरी पुण्याचे सांस्कृतिक राजधानी म्हणून कोथरूडचा उल्लेख केला जातो. कोथरूड भागातले राजकारण म्हणजे तेवढेच कडक, निष्ठ आणि कट्टर या भागातील सर्वच पक्षातील कार्यकर्ते आपापल्या पक्षाच्या विचारांची आणि कृतिशील बांधिलकी राहते राखत असले तरीही अन्य पक्षातील सूचना आणि प्रतिक्रिया यांचा सन्मान करण्याचे वेगळेपण आज पुणे शहरात कोथरूड भागातच पाहण्यास मिळते. कोथरूड भागातील स्थानिक नगरसेविका वासंती नवनाथ जाधव यांच्यावतीने कोथरूड भागातील मुख्य चौक सुशोभिकरण करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथविधीचे शिल्प बसवण्यात आले होते; परंतु या भागात काम करत असलेल्या शिवप्रेमी लोकांकडून यांना विरोध झाला. नवनाथ जाधव या शिवविचारांशी निष्ठ कार्यकर्त्याने महाराजांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखत संबंधित शिल्पांमध्ये काही दिवसांमध्ये बदल करून एक वेगळा सामाजिक संदेश देण्याचे काम केले.

अधिक वाचा  पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रोनचे ६ रुग्ण; निर्बंध लादणार का? आयुक्त म्हणाले…

कोथरूड भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी या प्रमुख पक्षांच्या मध्ये या संकल्प चित्रामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची जाणीव पुणे महानगरपालिका आणि कोथरूड पोलीस ठाणे यांना झाली आणि यामध्ये समापचाराने मार्ग काढण्याचा निश्चय करण्यात आल्यानंतर  फक्त तुमचं_आमचं_नात_काय जय_जिजाऊ_जय_शिवराय या शिवप्रेमींच्या ओळी वरतीच सर्व विरोध मावळला आणि दोन आठवडे एकमेकाला विरोध करणारे नवनाथ जाधव व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते केदार मारणे एकत्र आले हेच वेगळेपण आज सर्वांच्याच चर्चेचा विषय बनले आहे.

घटनाक्रम खालील प्रमाणे-

काही दिवसांपूर्वी कोथरूडमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे शपथविधी शिल्प उभारण्यात आले.

अधिक वाचा  राज ठाकरेंचा दौरा ठरला: अयोध्येसह हे ही नियोजन- नांदगावकर

शिल्प उभे करताना थोडी चुक झाली.

राष्ट्रवादी पक्षाकडून पुणे महापालिका आणि कोथरुड पोलिस स्टेशन यांना लक्षात आणून दिले.

चुक दुरुस्त करण्याची मागणी.

आमच्या मागणीची भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नवनाथदादा जाधव आणि त्यांच्या पत्नी सौ. वासंती जाधव यांनी जबाबदारीने लक्ष घालून शिल्पावरील नावे खाली घेतली.

शिल्प केल्याबद्दल केदार वसंत मारणे आणि माझा मित्र परिवाराच्यावतीने नवनाथ जाधव यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मंगेश नवघणे ,सागर फाटक , पत्रकार माऊली म्हेत्रे उपस्थित होते.