कोरोना काळात तर व्यवसाय ठप्प झालेली असताना खास दिपावली निमित्त वारजे माळवाडी परिसरातील महिलांनी बनविलेल्या गृहउपयोगी वस्तुंना हक्काचे व्यासपीठ निर्माण होणे ही अभिमानास्पद गोष्ट असून महिलांनी बनवलेल्या वस्तू व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठीच मी पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या सौ दिपाली प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ यांच्या स्वीकार केला आहे. सामान्य कुटुंबातील महिलांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले हक्काचे दोन पैसे मिळण्यासाठी या उपक्रमाचा नक्कीच फायदा होणार असून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या प्रदर्शनाला भेट चे मत मराठी चित्रपट अभिनेत्री व राष्ट्रवादी सांस्कृतिक विभाग पुणे जिल्हा अध्यक्षा प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांनी व्यक्त केले.

अधिक वाचा  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज; डॉक्टरांचा हा सल्ला

श्रीमंत राजयोग गणेश मित्र मंडळ, वारजे हायवे परिसर विकास प्रतिष्ठाण प्रभाग क्र. ३१ व ३२ मधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामार्फत वारजे भागांमध्ये प्रथमच दिवाळी सणानिमित्त उपयुक्त असलेल्या ग्रहउपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव २९ ऑक्टो ते दि. ३१ ऑक्टो २०२१ रोजी मॅजेस्टिक हॉल शेजारी, व्हॉयोला चौक, माई मंगेशकर हॉस्पिटल जवळ, वारजे, पुणे येथे आयोजित केले असून आज दुपारी प्रिया बेर्डे यांनी या प्रदर्शन व विक्री महोत्सवाला सदिच्छा भेट दिली. या प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व स्टॉल धारकांची आस्थेवाईकपणे चौकशी करत त्यांच्या विविध पदार्थांची चव चाखत यांनी आपल्या दिवाळीची निगडीत असलेल्या वस्तूंची खरेदी करून उद्योजिकांना प्रोत्साहन देण्याचे काम केले.

अधिक वाचा  शेतमालाची ‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत १२४५ ठिकाणी विक्रीव्यवस्था

परिसरामध्ये हा प्रथमच प्रयोग केला असून या भागातील स्थानिक नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. या भागातील अनेक होतकरू व कल्पक विचारांच्या महिलांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी असे अनेक प्रयोग केले जाणार असल्याचे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या सौ. दिपाली प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ यांनी सांगितले. तर महिलासाठी या प्रदर्शनात छान गोष्टी असुन महिलांना मदत करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रतिसाद देण्याचे आव्हानही यावेळी करण्यात आले. तर माजी नगरसेवक प्रदीप उर्फ बाबा धुमाळ यांनी वारजे परिसरातील हा अनोखा उपक्रम अत्यंत स्तुत्य झाला असून या भागातील महिलांच्या उद्योगाला प्रतिसाद व प्रोत्साहन देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहत असून यामुळे महिलांचे पाठबळ वाढत आहे. तसेच शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार व अभिनेते अमोल कोल्हे, प्रशांत जगताप हेही आज संध्याकाळी या कार्यक्रमाला भेट देणार असल्याचे सांगितले.