दिया फाउंडेशन च्या वतीने आकाशकंदील, पणती आणि मिठाई वाटपाचा अनोखा उपक्रम

हडपसर : दिपावली हा नात्याला ऋणानुबंध करणारा माणुसकी आणि नम्रतेचा दिप उत्सव आहे.दिपावली हा उत्सव आपल्याला  आनंद,प्रेम आणि सकारात्मकतेची नवं उर्जा देऊन जातो,अशी ऊर्जा गरीबी हटवा हा नारा देत गोर – गरीबांची दिवाळी गोड करणाऱ्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा वैचारिक वारसा आपल्या कृतीतून दिया फाउंडेशन पुढे चालवत आहे. दिया फाउंडेशन च्या अनेक सामाजिक उपक्रमाला सर्वांची मिळणारी साथ हा हडपसरमध्ये नवा राजकीय इतिहास घडवणार आहे असे मत माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी बोलताना व्यक्त केले.

अधिक वाचा  सिंहगड रस्ता कागदावर ‘ड्रीम प्रोजेक्ट’ प्रत्यक्षात दिवसेंदिवस अर्धवट

दिया फाउंडेशन च्या वतीने दीपावलीचा प्रकाश घरोघरी निर्माण होऊन सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी आकाशकंदील, पणती आणि मिठाई वाटपाचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिया फाउंडेशन चे संस्थापक तथा पुणे शहर काँग्रेस आय कमिटीचे संघटक इम्रानभाई शेख, मार्गदर्शक अम्मी नसीम शेख, अल्ताफभाई शेख, गुलाब सय्यद, असलम शेख, तरन्नुम जमादार, अभिनेत्री नेहा, तृतीयपंथी प्रिती सातारकर, रुक्सार, मुख्य बंदीर जोडपे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी दिया फाउंडेशनचे मतीन शेख, टिपू सय्यद, तौफीक शेख, हुजेफा शेख, अलीम बागवान, असलम सय्यद, जबार शेख, नीहाल मुलानी, अयुब अनसरी, साहील शेख, वसीम शेख, सुफियान काझी, अंकीता माने, सदफ काझी, अलीया सय्यद व रामभाऊ यांनी परिश्रम घेतले.

अधिक वाचा  राज्याच्या हवाई निर्बंधांवर केंद्राचा आक्षेप ; नियम सुसंगतीची सूचना

कार्यक्रमाचे प्रस्तविक इम्रानभाई शेख यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. निलेश बढे यांनी केले तर आभार मतीन शेख यांनी मानले. यावेळी कोरोना चे सर्व नियम व अटीचे पालन करून महिला आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.