कोथरूड- बावधन क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने “स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण मिशन २०२१ – २०२२” स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिका जनवाणी सहकारी संस्था कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनी सेवा सह्योग फाउंडेशन, क्रिश डान्स अकॅडमी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रं. १२, डहाणूकर कॉलनी वा कोथरूड गावठाण हजेरी कोठी अंतर्गत लक्ष्मी नगर वसाहतीमध्ये शून्य कचरा प्रकल्पांतर्गत पर्यावरण पूरक किल्ले स्पर्धा व आकाश कंदील बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर किल्ले स्पर्धा ही दिवाळी सणाच्या प्रारंभीच्या कालखंडात घेतली जाते. पर्यावरण पूरक किल्ला स्पर्धा व आकाश कंदील बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांना व नागरिकांना स्वच्छतेचा संदेश व कोणताही सण साजरा करत असताना पर्यावरण पूरक व निसर्गनिर्मित वस्तूंचा वापर करण्याचा संदेश दिला जातो. तसेच मानवी जीवनामध्ये निसर्ग किती महत्त्वाची भूमिका बजावतो याविषयी जनजागृती केली जाते.

आधुनिक कालखंडामध्ये दिवाळी हा सण साजरा करत असताना सर्रास नागरिक हे फायबर व प्लास्टर ऑफ पॅरिस चे किल्ले तसेच प्लास्टिक व थर्माकोल पासून तयार केलेले आकाश कंदील आणून आपल्या पाल्यांना देतात. त्या वस्तूंचा वापर झाला की कचऱ्या मध्ये टाकल्या जातात परत या वस्तू कचर्‍यात लवकर समाविष्ट होत नाही त्यामुळे पर्यावरणास व मानवाच्या आरोग्याला विघातक परिस्थिती निर्माण होते. तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडातील व तत्पूर्वी बांधलेल्या ऐतिहासिक वास्तूंचे ज्ञान व्हावे व ऐतिहासिक कार्याचा वारसा पुढे चालू ठेवावा शिवाय या वास्तूचे राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करावे.

अधिक वाचा  "महाराष्ट्रातही आमचे मतभेद आहेत तरीही..."यूपीएच्या नेतृत्वावरुन संजय राऊतांनी ममतांना दिला सल्ला

महाराष्ट्रात व भारतात अनेक किल्ले हे ऐतिहासिक राष्ट्रीय स्मारक म्हणून आपण जतन केलेले आहे त्या ठिकाणी नागरिक स्मारक पाहण्यासाठी जातात ते स्वच्छ व सुंदर राहिले पाहिजे हा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला. सदर कार्यक्रमाला लागणारे साहित्य कमिन्स इंडिया लिमिटेड जनवाणी व सेवा सह्योग फाउंडेशन या संस्थेने उपलब्ध करून दिले. या किल्ले स्पर्धेमध्ये क्रिश डान्स अकॅडमीचे प्रमुख कृष्णा शिंदे यांनी लक्ष्मी नगर मधील १५० सहभागी करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

तसेच या मुलांनी सिंहगड, तोरणा गड, जंजिरा, शिवनेरी, प्रतापगड, विशाळ गड, रायगड व भुईकोट किल्ले तयार केले. या मुलांनी त्यांचा कल्पकतेतून किल्ले तयार केले शिवाय त्या किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा काय आहे व त्या किल्ल्यावर कोणाचे राज्य होते तो किल्ला ताब्यात घेण्यासाठी कोणकोणत्या राजामध्ये युद्ध झाली व ती कशी ताब्यात घेतली याविषयी इत्यंभूत माहिती विद्यार्थ्यांनी कथन केल्या. तसेच विजेत्या स्पर्धकांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे विभागीय अध्यक्ष कॉ. धनंजय आयवळे, कॉ. राम अडागळे व सुदिक्षा फाउंडेशनच्या उमा मॅडम सहभागी झाल्या.

अधिक वाचा  बैलगाडा शर्यत सुरु होणारच; पशुसंवर्धन मंत्री केदार यांचा विश्वास

 ४० विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक आकाश कंदील पळविण्याच्या कार्यशाळेमध्ये सक्रिय सहभाग घेतला व प्रत्येकाने पुठ्ठा रंगीत कागद गोठीव कागद, गम, लोकरी दोरा यापासून सुबक व सुंदर आकर्षक आकाश कंदील बनवले. सदर कार्यशाळा युवराज चाबुकस्वार, दिव्या जाधव यांनी प्रशिक्षकाची भूमिका बजावली. तसेच अनुष्का शेट्टी, राजश्री वारे, सचिन शेख, शितल घोडके, दिव्या साळुंखे, अल्लाउद्दीन शेख, सानिका शेटे यांनी उत्कृष्ट आकाश कंदील बनवले.

सदर कार्यक्रम महापालिका सहाय्यक आयुक्त माननीय सचिन तामखडे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आरोग्य निरीक्षक सचिन लोहकरे, करण कुंभार हनुमंत चाकणकर रूपाली शेडगे, यांच्या निरीक्षणाखाली मोकादम वैजीनाथ गायकवाड अण्णा ढावरे जनवाणीचे समीर अजगेकर, जयश्री पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

अधिक वाचा  समुद्रपातळीत तिप्पट वाढ; या देशाचे अस्तित्वच धोक्यात; पाण्यातूनच जगाला आवाहन

कार्यकमाची सांगता !! फटाके मुक्त दिवाळीची शपथ !! मी एक जागरुक पुणेकर नागरिक म्हणून मी अशी प्रतिज्ञा करतो की, मी व माझा परिवार, माझ्या बाजूचा परिवार, व माझ्या पुणे शहरातील परिवारास फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणेस कटीबद्ध राहिल व यासाठी दिवाळीतील प्रत्येक दिवस फटाकेमुक्तीसाठी देईल. मी स्वतः फटाके वाजवणार नाही व इतरानाही वाजवू देणार नाही. मी फटाके ऐवजी निरोगी शरिरयष्टी व ज्ञान योगासाठी मी खर्च करीन. निरोगी आरोग्यासाठी मी उचलले प्रत्येक पाऊल हे माझ्या पुणे शहरातील प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याला, पर्यायाने माझ्या भारत मातेच्या रक्षणाला व स्वच्छता ठेवण्याच्या कामी येईल. !! स्वच्छ पुणे !! !! निरोगी पुणे !! !!आपले पुणे!! !! फटाके मुक्त पुणे !! अशी शपथ घेऊन करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैजीनाथ गायकवाड यांनी केले.