हडपसर : कोरोनासारख्या महामारीनंतर बचत गटांना पुन्हा उभे राहण्यासाठी महिलांनी उत्पादित केलेल्या घरगुती वस्तूंच्या विक्रीतून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी दिवाळी महोत्सवाचे आयोजन केले आहे. शिवसाई महिला उद्योग समूह महिलांना शाश्‍वत आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी नेहमीच अग्रेसर आहे. महिलांचे अर्थकारण बदलण्यासाठी सर्व घटकातील महिलांनी पुढे येणे काळाची गरज असून विविध सामाजिक उपक्रमातून समाजपरिवर्तन करण्यासाठी महिलांनी साथ द्यावी असे आवाहन शिवसाई महिला उद्योग समूहाचे सर्वेसर्वा तथा मांजरी बु.मा. उपसरपंच अमित आबा घुले यांनी केले.

मांजरी बुद्रुक येथे शिवसाई उद्योग समूहाच्या माध्यमातून आणि मा.उपसरपंच अमिता आबा घुले यांच्या संकल्पनेतून दिवाळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. दिवाळी महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ नगरसेविका रंजनाताई टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपा हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी कार्यक्रम अध्यक्षस्थानी होते. यावेळी भाजपा पुणे उपाध्यक्ष भूषण तुपे, सरचिटणीस गणेश घुले, मा.जि प सदस्य वंदना कोद्रे, मांजरी बु.मा.सरपंच शिवराज घुले, पुरुषोत्तम अण्णा धारवाडकर, मा.उपसरपंच उज्वला टिळेकर, समीर घुले, प्रमोद कोद्रे, नयना बहिरट,सीमा घुले, भाजप महिला आघाडी हडपसर अध्यक्ष स्वाती कुरणे, उपाध्यक्ष शोभा लगड, प्रांजल धायरकर, भाजपा मांजरी बु.अध्यक्ष सत्यवान घुले, तंटामुक्ती उपाध्यक्ष बबलू गायकवाड, युवा नेते बबन जगताप आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  एसटी कर्मचारी संपावरून देवेंद्र फडणवीसांनी केली टीका, “मेस्मा लावण्याऐवजी राज्य सरकारने.”

दिवाळी महोत्सवांमध्ये मांजरी – केशवनगर भागातील सर्व बचत गट समूह आणि वैयक्तिक घरगुती महिलांनी बनवलेल्या विविध वस्तू, खाद्यपदार्थ तसेच आकाश कंदील, साड्या, सेंद्रीय धान्य,पणती, ड्रेस मटेरियल, ड्रायफ्रुट्स, ज्वेलरी, दिवाळी फराळ, कॉस्मेटिक मटेरियल यासह चुलीवर बनवलेले व्हेज – नॉनव्हेज खाद्य पदार्थ, स्नॅक्स नागरिकांना अल्प दरात मिळणार आहेत. दिनांक 27 ऑक्टो. ते 1 नोव्हेंबर याबकालावधीमध्ये मांजरी – मुंढवा रोड, म्हसोबा वस्ती याठिकाणी अमित आबा घुले यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत खरेदी – प्रदर्शन दिवाळी महोत्सव भरणार आहे. या दिवाळी महोत्सवात दररोज लकी ड्रॉ काढण्यात येणार असून नागरिकांना विविध वस्तू बक्षीस स्वरूपामध्ये मिळणार आहेत.

अधिक वाचा  'स्वारद' फाऊंडेशन तर्फे भव्य किर्तन महोत्सव; मान्यवरांची सुश्राव्य कीर्तने

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमित आबा घुले मित्रपरिवार आणि शिवसाई महिला उद्योग समूह यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अमित आबा घुले यांनी केले. सूत्रसंचालन मा. तंटामुक्ती अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर यांनी केले तर आभार सागर प्रभुणे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती कोरोनाचे सर्व नियम व अटींचे पालन करून होती.