नवी दिल्ली : नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमध्ये आता मलिक यांच्याविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. समीर वानखेडे यांची बहिण यास्मिन वानखेडे यांनी याबाबत पोलिसांत धाव घेतली आहे. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे.

एएनआयच्या माहितीनुसार, एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची बहिण यास्मिन वानखेडे यांनी राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र लिहिलं असून आपल्या संविधानिक हक्कांचं संरक्षण व्हाव अशी विनंती त्यांनी पत्रातून केली आहे. त्याचबरोबर त्यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात पोलिसांत एफआयआर देखील दाखल केला आहे.

अधिक वाचा  अमोल कोल्हे ट्रोल, पुणे प्रशासनावर केली टीका