पुणे : कोथरूड सारख्या सुशिक्षित लोकांच्या भागात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे गुन्हेगारांना जाहीर पक्ष प्रवेश देत आहेत. यातून भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. पाटील यांनी पुण्याची संस्कृती बिघडवू नये असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला.

मंगळवारी चंद्रकांत पाटील यांनी काही गुन्हेगारांचा पक्षात प्रवेश करून घेतला, त्यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह इतर पदाधिकारी तेथून बाजूला झाले. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात चंद्रकांत पाटील हे तडीपार गुंड दीपक गागडे व नाना मोघे यांच्यासोबत कार्यक्रमांमधील फोटो दिसून आले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्यासोबत गुन्हेगारांसबोत दिसून येत आहेत. भाजपकडून आगामी महापालिका निवडणुकीत आशा गुन्हेगारांच्या जोरावर लढवणार असल्याचेच हे दिसून येत आहे.

अधिक वाचा  जागतिक एड्स दिन २०२१: एड्स आजाराविषयी गैरसमज,इतिहास आणि महत्त्व सविस्तर वाचा

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील गुंडगिरी मोडून काढू असे जाहीर सांगितले होते, पण आता त्यांचेच प्रदेशाध्यक्ष गुंडगिरीला बळ देत आहेत. पुणे सुसंस्कृत शहर आहे, याची वातावरण बिघडवू नका अशी टीका जगताप यांनी केली

राष्ट्रवादीत एकही गुन्हेगार घेणार नाही

आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षप्रवेश करत असताना एकाही गुन्हेगाराला राष्ट्रवादीत घेतले जाणार नाही. आम्ही लोकांचा विश्‍वास संपादन करून ही निवडणूक जिंकू असे जगताप यांनी स्पष्ट केले.