पुणे : राज्यातील मुंबई, पुण्यासह महत्वाच्या महापालिका निवडणुका पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणार आहेत. अशावेळी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. महापालिका निवडणुकीतही महाविकास आघाडी होणार का? असा प्रश्न विचारला जातोय. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका होणार आहे. पुणे शहर काँग्रेस कार्यकारिणीने आज दुपारी बैठक बोलावली आहे. दुपारी 4 वाजता काँग्रेस भवनात ही बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत युती करायची की नाही? या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. यासाठी पुण्यातील पदाधिकाऱ्यांचं मत घेऊन प्रदेश कार्यकारिणीला कळवलं जाणार आहे.

दुसरीकडे 31 ऑक्टोबरला तारखेला पुण्यात शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि सहसंपर्कप्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांचं मत घेऊन मुंबईत मातोश्रीवर निरोप पोहोचवला जाणार आहे. पुण्यात महापालिकेत महाविकास आघाडी एकत्र येणार का? याच मुद्द्यावर आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक होत आहे. येत्या आठवड्याभरात पुण्यात आघाडीबाबत शिक्कामोर्तब होणार आहे. तर शिवसेनेचं मात्र 31 ऑक्टोबरला ठरण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  NCP कार्यालयातच २ कार्यकर्ते भिडले; गुन्हा मात्र अदखलपात्रच; शहराध्यक्षाचीही सावध प्रतिक्रिया

शरद पवार बैठक दिवाळीनंतर घेणार

राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी जय्यत तयारी सुरु झाली आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत दिवाळीनंतर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक होणार आहे. त्याबाबत पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माहिती दिली आहे. या बैठकीत आजी माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे दिवाळीनंतरची राष्ट्रवादीची ही बैठक महत्वाची ठरण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र, पुण्यासारखी महत्वाची महापालिका काबिज करण्यासाठी राष्ट्रवादीकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

पुणे महापालिका पक्षीय बलाबल

अधिक वाचा  भाजपवाल्यांच्या माझ्याकडे सीडी, लावल्या तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही : मलिक

भाजप 99            काँग्रेस 09
राष्ट्रवादी 44           मनसे 2
सेना 9                एमआयएम 1
एकूण 164