पुणे : पुणे महानगरपालिकेत सध्या असलेली १६२ नगरसेवकांची संख्या १८३ पर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई महापालिका प्रांतिक अधिनियमात सुधारणा करण्यात येणार असून यामुळे राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये नगरसेवकांची संख्या दहा टक्केनी वाढणार आहे. शहराची लोकसंख्या ३० लाख असेल तर १६१ नगरसेवक तसेच पुढील प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे एक नगरसेवक या सध्याच्या तरतुदीत बदल करण्यात येणार आहे. या बदलाचा प्रस्ताव येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

सध्याच्या कायद्यानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात नगरसेवकांची संख्या निश्चित होत असते. आगामी निवडणुका २०११ च्या जनगणेनुसार होणार आहेत. प्रत्यक्षात सध्याची लोकसंख्या २०११ पेक्षा कितीतरी अधिक आहे. मतदारसंख्येतील ही तफावत दूर करण्यासाठी कायद्यात दुरूस्ती करण्यात येणार आहे. यानुसार ३० लाख लोकसंख्येला १६१ नगरसेवक तर त्यापुढील प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे एक नगरसेवक या ततुदीत बदल करण्यात येणार आहे.

अधिक वाचा  हिवाळी अधिवेशन: १२ खासदारांचे निलंबन; काँग्रेस ५, तृणमूल आणि शिवसेनेच्या २ खासदारांचा समावेश

गेल्या पाच वर्षात पुणे महापालिकेत समावेश झालेल्या गावांची लोकसंख्या तसेच पुण्याची वाढलेली लोकसंख्या गृहीत धरली तर ती संख्या ३५ लाख आहे. कायद्यात दुरूस्ती झाल्यानंतर नगरसेवकांच्या संख्येत १० टक्केनी वाढ झाल्यानंतर पुण्यातल्या नगरसेवकांची संख्या १७ नी वाढण्याची शक्यता आहे.

पुण्यातील नगरसेवक १७ वाढ शक्य

पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या सुधारीत कायद्यातील तरतुदीनुसार १७ नी वाढू शकते. सध्या महापालिकेत १६६ नगरसेवक होत आहे. त्यामध्ये १० टक्के वाढ गृहीत धरली तर ही संख्या वाढून १८३ पर्यंत जाईल.