मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावर शाहरुख खानच्या समर्थनार्थ अनेक बॉलिवूड सेलेब्स पुढे आले आहेत. शाहरुख खानचा मुलगा आर्यनला एनसीबीने ताब्यात घेतल्यापासून, उद्योग जगतामधील लोक खान कुटुंबाला पाठिंबा देत आहेत. सलमान खान, साजिद नाडियादवाला सारखे लोक तर शाहरुख खानच्या घरी गेले आहेत.

मात्र, इंडस्ट्रीत असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी आर्यन खान प्रकरणावर अद्याप मौन सोडलेले नाही. यामध्ये अक्षय कुमारचाही समावेश आहे. अक्षय कुमारने आर्यन खान प्रकरणावर अद्याप काहीही बोललेला नाही, त्यामुळे लोक थोडे आश्चर्यचकित झाले आहेत. अक्षय कुमार त्याचा मित्र शाहरुख खानच्या पाठीशी उभा राहील, अशी लोकांना अपेक्षा होती पण तसे झाले नाही.

अधिक वाचा  राज ठाकरेंच्या घरी भाजप-मनसे युतीवर चर्चा? फडणवीसांचे पहिल्यांदाच सविस्तर उत्तर

चित्रपट समीक्षक केआरकेच्या ताज्या ट्विटवर विश्वास ठेवायचा असेल तर, अक्षय कुमारला वाटते की आर्यन खानने चुकीचे केले आहे आणि कायद्यानुसार जे बरोबर आहे ते होईल. केआरकेने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘जेव्हा एका मित्राने अक्षयला विचारले की, आर्यन खान प्रकरणावर तु काही का बोलला नाही, तेव्हा त्याने सांगितले की तो शाहरुखच्या विरोधात नाही आणि त्याच्या समर्थनातही नाही. शाहरुखच्या मुलाने चूक केली असून त्याला शिक्षा भोगावी लागेल. बरोबर आहे ही बॉलिवूड फॅमिली आहे.’

सध्या अक्षय कुमार त्याचा आगामी चित्रपट सूर्यवंशी रिलीज करण्यात व्यग्र आहे, जो दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांसमोर येणार आहे. सूर्यवंशी या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे, जो किंग खानच्या अगदी जवळचा आहे. रोहित शेट्टी आणि शाहरुख खान यांनी एकत्र चेन्नई एक्स्प्रेस आणि दिलवाले सारखे चित्रपट केले आहेत. आर्यन खानच्या अटकेनंतर रोहित शेट्टीने शाहरुख खानला फोन केल्याची माहिती समोर आली होती.