कोथरूड येथे प्रभाग क्रमांक १२ मध्ये शनिवारी रात्री छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे शपथविधी शिल्प उभारण्यात आले आहे; परंतु हे शिल्प बालहट्ट पुरवण्यासाठी हे शिल्प बालीश पणातुन घाईघाईने लावण्यात आले. त्याला कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नाही, काचेचे आवरण नसल्यामुळे विटंबना होऊ शकते. तरी शासकीय नियमानुसार संबंधित शिल्पाला सुरक्षित करण्यात यावे अशी मागणी कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय साह्यक आयुक्त सचिन तामखडे यांच्या कडे राष्ट्रवादी काँग्रेस ग्राहक संरक्षण समिती पुणे शहर माजी उपाध्यक्ष केदार मारणे यांनी केली आहे.

महापालिकेच्या वतीने कोणत्याही ऐतिहासिक पुरुषाचे शिल्प उभारताना त्यासाठी समिती असते शिल्पाचा आकार आणि रचना यावर ती काम केले जाते त्यानंतरच शिल्प निर्मिती व लोकार्पण केले जाते परंतु सध्या असुरी बहुमत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या बालिश नगरसेवकांना याचे भान असून यांना सुशोभीकरण आणि ऐतिहासिक पुरुष यांचे स्मरण चित्र यातील फरक कळत नसल्यामुळे हे शिल्प रस्त्यालगत उभारण्यात आले आहे. जाणाऱ्या गाडीचे साचलेले पाणी पण त्या शिल्पावर ऊडु शकते हा विचार करावा. आणि लवकरात लवकर दुरुस्त करावे.

अधिक वाचा  "महाराष्ट्रातही आमचे मतभेद आहेत तरीही..."यूपीएच्या नेतृत्वावरुन संजय राऊतांनी ममतांना दिला सल्ला

तसेच आपण जे शिल्प उभारले आहे ते महापुरुषाचे आहे म्हणून त्याची विटंबना त्याचा अपमान होणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी होती पण ती घेतली गेली नाही. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा दर्जा सर्वोच्च स्थानी आहे आम्ही त्याच्यावरती आय लव कोथरूड आणि स्थानिक नगरसेवकांची नावे त्यांच्या डोक्यावर देण्यात आली आहे म्हणून ही नावे लवकरात लवकर काढून शिल्पाच्या खाली टाकावी. आई लव कोथरूड काढून ते मुख्य ठिकाणी लावावे म्हणजे कोथरूडच्या बाहेरील लोकांना पण ते दिसले जाईल आपण स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर दुरुस्त करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.