स्वारगेट : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आरोग्याचे महत्त्व उमगलेले आहे. दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल यांच्या वाढणाऱ्या किमतींनी त्रस्त झालेल्या नागरिकांनी आपला मोर्चा अत्याधुनिक सुविधांनीयुक्त इलेक्ट्रिक सायकल खरेदीकडे वळवला आहे. विशेषतः महिलावर्ग व लहान मुले या वर्गातून सायकलीस विशेष मागणी होत आहे.

या इलेक्ट्रिक सायकलचे फायदे अनेक होत असल्याने त्यामुळे नागरिकांच्या खरेदीसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने या सायकलच्या उद्योगविश्वाला पुढील काही दिवसात सोनेरी दिवस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इलेक्ट्रिक सायकलची निर्मिती करणाऱ्या कंपन्याही ग्राहकांना नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना आकर्षित करत आहेत. या सायकली सुमारे २५ ते ६५ हजारपर्यंत उपलब्ध असून त्यात देशी-विदेशी कंपन्यांचाही समावेश आहे.

अधिक वाचा  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज; डॉक्टरांचा हा सल्ला

हे आहेत फायदे- 

पेट्रोल बचत,

सायकलचा व्यायाम आरोग्यास हितकारक

पॉवर बॅटरी बॅकअपची सोय

एका चार्जिंगमध्ये २५ ते ६५ किलोमीटरपर्यंत धावते

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सायकल उपयुक्त

वयोगटानुसार नागरिकांसाठी

सुसह्य सायकलची रचना

अशी आहे ई सायकल

चार्जिंग संपल्यावर पायंडल मारून सायकल चालवू शकतो. या सायकल फोल्ड करून मोटारीत ठेवता येतात लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असल्यास त्यासाठी अतिरिक्त बॅटरी मिळू शकते. ॲल्युमिनियमचा वापर असल्याने वजन हलके आहे.

“मी गेल्या दीड वर्षापासून दररोजच्या कामासाठी इलेक्ट्रिक सायकल वापरत आहे. पायंडल मारायचा थकवा आला तर चार्जिंगवर आपोआप धावते, त्यामुळे ही सायकल वापरण्यास अतिशय सुसह्य आहे.”

अधिक वाचा  'स्वच्छ'ला काम मिळताच साहित्य खरेदीही सुरू

इलेक्ट्रिक सायकलचा ग्राहक