इंदापूर : जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या मागणी नुसार महाराष्ट्रास तातडीने लोकायुक्ता ची नियुक्ती करावी अशी आग्रही मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन पुणे जिल्हा संघटक शिवाजी खेडकर यांनी केली.

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाची मासिक बैठक इंदापूर येथे शिवाजी खेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.यावेळी श्री.खेडकर व तालुका संघटक जनार्दन पांढरमिसे यांच्या हस्ते इंदापूर तालुका सहसंघटकपदी शामराव जाधव, सचिवपदी श्री मोहिते, खजिनदार पदी अनिल चितळकर, सहखजिनदार पदी श्री. चव्हाण, सहसचिवपदी कविता कसबे, ,शहर संघटकपदी प्रशांत शिताप,सहसंघटक पदी लक्ष्मण गडदे, सचिव पदी दशरथ भोंग यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

अधिक वाचा  पुणे विमानतळावर पेशवाईची चित्रं, मग शिवरायांचं कर्तृत्व का नाही? - अमोल कोल्हे

शिवाजी खेडकर पुढे म्हणाले, सर्वसामान्य गरजू नागरिकांपर्यंत शासकीय योजनापोहोचणे गरजेचे असून त्यासाठी शासकीय कामकाजा वर अंकुश असणे गरजेचे आहे.यावेळीत्यांनी ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांनी देशासदिलेल्या अकरा कायदयांची माहिती दिली.

जनार्धन पांढरमिसे म्हणाले, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनचे काम देशांमध्ये सुरू असून यामध्ये तरुण वर्गांना वेगवेगळ्या शासकीय समिती,इतर समित्यावर काम करण्याचीमोठी संधी असून युवापिढीने स्वतास सिद्ध करावे.