पुणे : पुणे महानगर नियोजन समितीसाठी सदस्य पदाच्या ३० जागांसाठी १०८ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. यातील पालिका गटातील २२ नगरसेवकांना चार महिनेच मिळणार आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरु आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी सोमवारी (दि.२५) दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम मुदत आहे. त्यानंतरच महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी तीन क्षेत्र आहेत. मोठे नागरी क्षेत्रात पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समावेश होतो. या क्षेत्रातून नगरसेवकांमधून २२ सदस्य निवडून द्यायचे आहेत. या २२ जागांसाठी २७ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. लहान नागरी क्षेत्रात नगरपरिषदेचा समावेश होत आहे. यामध्ये एक जागा असून ६ उमेदवारांचा अर्ज भरले आहेत. तर ग्रामीण क्षेत्रातील ७ जागांसाठी ७५ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. पीएमआरडीएचा विकास आराखडा प्रसिध्द झाला असून त्यावर नागरिकांनी हरकती सुध्दा नोंदविल्या आहेत. त्यामुळे या समितीवर जाण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे.

अधिक वाचा  काँग्रेसशिवाय आघाडी ही मोदींना मदतच; चव्हाणांचा निशाणा

क्षेत्र                                      एकूण मतदार

पुणे, पिंपरी-चिंचवड मनपा                 २८५
नगरपरिषदा                                 ११४
ग्रामीण                                      ५८०