कोथरूड : भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या तर्फे माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ भारतरत्न ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त आयोजित “सफर विमानांची सफर हवाई दुनीयेची” या अनोख्या प्रदर्शानाचे उद्घाटन श्री भूषण गोखले एअर मार्शल (नि) व महापौर मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्या हस्ते पार पडले. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. लोकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे उद्याही हे प्रदर्शन सुरु राहणार असल्याचे आयोजक दुष्यंत मोहोळ यांनी सांगितले.

यावेळी (नि) एअर मार्शल भूषण गोखले विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांच्या अनेक प्रश्नानां दिलखुलास उत्तरे दिली. भारती हवाई दल, सैन्य दल या मध्ये भरती होण्यासाठी आतापासुन व्यायाम करण्यावर भर दिला पाहीजे तसेच व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन परिक्षांची तयारी केली पाहीजे. मानसिक दृष्ट्या सक्षम असणे गरजेचे असून कोणत्याही प्रकारच न्यूनगंड मनामध्ये बाळगु नये. मुलींच्यासाठी आता NDA चे दरवाजे उघडले असून मुलीनां या संधीचा फायदा घेत देशाची सेवा केली पाहीजे.

अधिक वाचा  किरण गायकवाड ‘देवमाणूस २’मध्ये दिसणार कि नाही?

संगणक प्रणाली व ड्रोन च्या क्षेत्रात मुली चांगल्या काम करु शकतात. तसेच भारत हा एके दिवशी शस्त्रास्त्रे, लढाउ विमानांच्या बाबतीत आत्मनिर्भर झालेला आपल्या दिसेल. मिसाईल क्षेत्रात भारताची कामगिरी दमदार आहे, मिसाईल बनविण्यासाठी आपणही डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्यासोबत काम केल्याच्या आठवणीनां उजाळा दिला, बांग्लादेश फाळणी युध्दाच्या वेळी त्यांनी व त्यांच्या बंधुनी केलेल्या कामगिरीचा उल्लेख भूषण गोखले यानी केला
युध्दाच्या वेळी हार आणि जित असते तिथे प्रथम किंवा द्वितीय क्रमांक नसतो त्यामुळे भविष्यात आपण विद्यार्थ्यानी अशी कामगिरी करावी ज्यामुळे आपल्या देशाचा विजयच झाला पाहीजे.

अधिक वाचा  कमी गुंतवणूकीमध्ये दरमहिना 60 हजार रुपये कमवा, SBI चा धमाका

यावेळी कोथरूड भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष श्री दुष्यंत अनिल मोहोळ यांनी भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पावलावर पाउल ठेवीत आजच्या पिढीने भारताच्या सरक्षंण क्षेत्रात कामगिरी करावी यासाठीच हे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे असे आवर्जून नमूद केले.