मुंबईः भारताने जरी 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला असला तरीही कोरोना महामारी काही संपलेली नाही. या 100 कोटी लसीकरणामध्ये जवळपास 71 कोटी लोकांना पहिला डोस मिळालेला आहे आणि जवळपास 29 कोटी लोकांनाच दोनही डोस मिळून लसीकरण पूर्ण झाले आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने आणि अनेक तज्ञांने भारतात तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला आहे आणि तो धोका टळलेला नाही.  भारतात तिसरी लाट आलीच तर ती दुसऱ्या लाटेसारखी भयावक असणार नाही, जर नवीन वेरिएंट आला नाही तर, असा तज्ञांचा अंदाज आहे. ब्रिटेन, चीन सारख्या देशात जीथे मृत्यूंचा आकडा कमी होता आणि लसीकरणाची टक्केवारी जास्त आहे तिथे आता रूगणसंख्या वाढली आहे.

अधिक वाचा  राऊतांचे सध्याचे नेते सोनिया, राहुल आणि प्रियंका - फडणवीस

भारतात सध्याची आकडेवारी

शनिवारी भारतात 16,326 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता पर्यंत भारतात एकूण 3,41,59,56 रूगणांची संख्या झाली आहे आणि आता सक्रीय रुगण 1,73,738 अहेत जे मागच्या 233 दिवसांसधील सर्वात कमी आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

मृत्यूंचा आकडा 4,53,708 झाला आहे ज्यात काल 666 मृत्यूंची नोंद झाली. कोरोना रूणांची संख्या मागच्या 29 दिवसांपीसून प्रतिदीन 30,000 पेक्षा कमी नोंद होत आहे आणि मागच्या सलग 118 दिवसांपासून प्रतिदीन रूगणांची नोंद 50,000 पेक्षा कमी आहे.

सक्रीय रूगणांची संख्या ही एकूण रूणांमध्ये फक्त 0.51  टक्के आहे जी मार्च २०२० पासून सर्वात कमी आहे. रूगण बरे होण्याची टक्केवारी आता 98.16 आहे जी मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे, केंद्रीय आरोग्य विभागाने ही आकडेवारी दिली आहे. मागच्या 24 तासांमध्ये सक्रीय रूगणांची संख्या देखील 2,017 ने कमी झाली आहे.

अधिक वाचा  भाजपवाल्यांच्या माझ्याकडे सीडी, लावल्या तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही : मलिक

ब्रिटेन, चीन सारख्या देशात रुगण वाढ

भारतामध्ये कोरोनाची नवीन लाट आली तर ती दुसऱ्या लाटे एवढी भयावक नसेल जर नवीन वेरीएंट नाही आला तर. मात्र सद्ध्याचे कोरोना रुगणांचे आकडे कमी आहे म्हणून नवीन लाट येणारच नाही आसं नाही, आसं तज्ञांनी सांगीतले आहे. देशात आता दिवाळी सारखे मोठे सणवार येत आहेत त्यामूळे रुगणांची संख्या वाढण्याची भिती आहे. ब्रिटेन, चीन सारख्या देशात जीथे मृत्यूंचा आकडा कमी होता आणि लसीकरणाची टक्केवारी जास्त आहे तिथे आता नवीन कोरोना रूगण सापडण्याची संख्या वाढली आहे. हे नवीन रुगण वायरसच्या डेल्टा आणि डेल्टा प्लसचे आसल्याचे मानलं जात आहे.

अधिक वाचा  जागतिक एड्स दिन २०२१: एड्स आजाराविषयी गैरसमज,इतिहास आणि महत्त्व सविस्तर वाचा

भारतात लसीकरणाचा 100 कोटीचा टप्पा पार केला म्हणून देश साजरा करत आहे पण आजून वेगाने लसीकरण होणे गरजेचे आहे आणि सर्व कोरोना प्रतिबंधक नियम पाळले जातील याची काळजी घेणे गरजेचे आहे.